मोपल्यांचे बंड? छे, हिंदूंचा नरसंहार !!

पहिल्या महायुद्धात तुर्कस्थानचा पराभव झाला होता. त्यावेळी इंग्रजांनी त्या देशाचा राजाला जो जगभरातील मुसलमानांचा खलिफा होता, त्याला सत्तेतून खाली खेचले होते. इंग्रजांच्या या कारवाईमुळे जगभरातील सर्वच मुसलमान इंग्रजांवर नाराज झाले होते. तुर्कस्थानच्या सुलतानाला त्याची राजगादी परत मिळवुन देण्यासाठी भारतीय मुसलमानांनी खिलाफत चळवळ सुरू केली होती.
 
 
त्याच्याही आधीपासून धर्मांध मुसलमानांचे प्रयत्न काही कमी नव्हते. १८३६ ते १९२० पर्यंत यांनी मलबार भागातील अनेक हिंदूंच्या कत्तली केल्या, बायकापोरं पळवून नेली, स्त्रियांवर अत्याचार केले! का? यांच्याबद्दल धाक निर्माण व्हावा म्हणून. त्यांची इच्छा अशी होती की या मलबार जिल्ह्यात पूर्णपणे इस्लामिक राज्य असावं आणि या साठी त्यांनी हे केलेले आहे, या कत्तलिंचे कौतुक खलिफाच्याच्या मौलानाने सुद्धा केले आहे. आणि उदाहरण पण दिले, की आपल्याला असे लोक हवे आहेत जे धर्मासाठी काफिरांना मारतात आणि तिकडे इस्लामचे राज्य स्थापन करतात!
 
 
पण सदरहू गोष्ट १९२१ ची आहे, भारतभर खिलाफत चळवळ चालू होती, भारतात वेगवेगळ्या ठिकाणी मुस्लिम ओटोमान मधील खलिफासाठी ब्रिटिशांविरुद्ध आंदोलन करत होते. ज्या वेळेस संपूर्ण भारतातले क्रांतिकारी स्वातंत्र्यासाठी लढत होते, तेव्हा काही धर्मांध लोक हे ओटोमान मधील खलिफाच्या अधिकारासाठी आंदोलन करत होते. या आंदोलनामुळे भारतात जिथे जिथे मुसलमानांची संख्या जास्त होती तिथे त्यांनी मनमानी करण्यास सुरवात केली. 
 
 
आठव्या शतकापासून अरब व्यापाऱ्यांनी केरळच्या मलबार भागात वखारी काढल्या व इस्लामचाही प्रसार केला. त्यामुळे तेथे मुस्लिस वस्ती वाढू लागली. मुस्लिस शेतकऱ्यांना मोपला असे म्हणत असत. या मोपला मुसलमानांमध्ये बहुतांश लोक हे शेती आणि व्यापार करायचे, या भागातील बहुतांश जमिनीवर आणि मोठ्या व्यापारावर हिंदूंचा कब्जा होता. मोपला मुसलमान यांच्याकडे वेठबिगारी करायचे. त्यांना तिथे राबायची चौथाई मिळत असे. एकोणिसाव्या शतकात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. कंपनीच्या राज्यात शेतकरी विरुद्ध सावकार-जमीनदार वाद सुरू झाले आणि अरबस्तानातील कडव्या पुनरुत्थानवादी, सकल इस्लामवादी वहाबी विचारांचा पगडा मोपला शेतकऱ्यांवर बसू लागला. आर्थिक आणि धार्मिक संघर्षातून मुसलमान आणि मुसलमानेतर असा जातीय संघर्षही उद्‌भवला. परिणामी मोपल्यांमध्ये पुनरुत्थानवादी कडव्या वहाबी विचारांची पकड अधिकच घट्ट झाली. वहावी उद्दिष्टे प्रत्यक्षात आणण्यासाठी १९१९ साली मोठ्या प्रमाणावर हिंसा करून एका तालुक्यात वहाबी अंमल स्थापण्याचाही मोपल्यांकडून प्रयत्न झाला. तो सरकारने चिरडून टाकला. 
 
 
वर्षभराने गांधीनी खिलाफत आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला. त्यांनी तर असेही सांगितले की, जो खिलाफत विरोधी आहे तो कॉंग्रेसचा देखील शत्रू आहे. भारतीय स्वातंत्र्यता चळवळीत महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या मुस्लिम नेत्यांनी या चळवळीत देखील महत्वाची भूमिका बजावली होती. यात प्रामुख्याने अबुल कलाम आझाद, जफर अली खाँ, मोहम्मद अली आणि शौकत अली यांचा समावेश होता. महात्मा गांधींचा या चळवळीला समर्थन देण्यामागे हिंदू मुस्लिमांना स्वातंत्र्यता लढ्यासाठी एकत्र करण्याचा उद्देश होता. गांधींनी असहयोग आंदोलनाला खिलाफत आंदोलनाशी जोडण्यास जोर दिला होता. त्यांच्या मते असहयोगला खिलाफत सोबत जोडल्याने भारताचे दोन प्रमुख समुदाय हिंदू आणि मुसलमान  ब्रिटिश शासनाचा अंत करतील. पण ते काही खरं झाल नाही.
 
 
परंतु काँग्रेसवादी खिलाफत नेते कडवे धर्मगुरू होते. त्यांनी साऱ्या देशभर धर्मयुद्धाचे आवाहन केले. म.गांधींनी जरी अहिंसेचा आग्रह धरला असला आणि खिलाफत आंदोलनाचे नेतृत्व धर्मगुरूंनी म.गांधीना दिले असले, तरी या मुल्लामौलवींचा अहिंसेवर काडीइतकाही विश्वास नव्हता व ते तसे उघडपणे बोलूनही दाखवीत. खिलाफत आंदोलनाचे काळी सुशिक्षित मवाळ मुस्लिम नेते मागे पडले आणि मुल्ला मौलवींना अफाट लोकप्रियता मिळाली. त्यातून मलबारमध्ये वहाबी मौलवींना मोकळे रान मिळाले. त्यांच्या धर्मयुद्धाच्या भडक प्रचाराला धार आली आणि १९१९ साली वहाबी अंमल स्थापण्याचा प्रयत्न झाला तसा प्रयत्न संबंध मलबारभर करावा असे स्थानिक धर्मगुरूंच्या मनात आले.
 
 
 
 
 
१५ फेब्रुवारी, १९२१ साली सरकारने निषेधाज्ञा लागू करत खिलाफत आणि कॉंग्रेसचे नेता हसन, यू. गोपाल मेनन, पी. मोइद्दीन कोया आणि के. माधवन नायर यांना अटक केली. यानंतर हे आंदोलन स्थानिक मोपला नेत्यांच्या हाती गेलं.
 
 
२० ऑगस्ट १९२१ साली केरळच्या मलबार येथे मोपला विद्रोहला सुरवात झाली होती, मलबार येथील मुसलमानांचा हा विद्रोह अगोदर खिलाफत आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि इंग्रजांच्या विरोधात होता. पण लवकरच याला सांप्रदायिक हिंसेच रूप आलं. मोपल्यांनी मोठ्या प्रमाणावर खून, लुटालूट व जबरदस्तीने स्थानिक हिंदूंना बाटविण्याचे प्रकार केले. वरवर पाहता ब्रिटीश सरकारविरुद्ध ही बंडाळी असली, तरी तिला अखेर धार्मिक संघर्षाचे रूप आले आणि त्या संघर्षात हिंदूंची फार हानी झाली. ही बंडाळी सरकारने अखेर लष्कराकरवी मोडून काढली. या बंडाळीमुळे गांधीजींनी पुकारलेल्या असहकारितेच्या आंदोलनाला मात्र खीळ बसली. मोपल्यांचे हिंसाचार आणि अत्याचार यांचा खिलाफत आंदोलनाशी काही संबंध नाही असे जरी काँग्रेस व खिलाफत नेत्यांनी जाहीर केले, तरी या गोष्टीचा कडक निषेध करण्याचे धैर्य काँग्रेस नेत्यांना झाले नाही. खिलाफत नेत्यांनी तर या हिंसाचारी कृत्यांचे अप्रत्यक्षतः समर्थनच केले. या धोरणाची देशभर तीव्र प्रतिक्रया उमटली. काँग्रेस-खिलाफत नेते मौलाना हसरत मोहानी यांच्या "मोपल्यांचे इंग्रजांशी स्वातंत्र्ययुद्ध चालू असता स्थानिक हिंदूंनी स्वसंरक्षणार्थ इंग्रजी सैन्याला पाचारण केले आणि त्यामुळे मोपल्यांना चीड आली" या वक्तव्यामुळे तर आगीत तेल ओतल्यासारखे झाले. खिलाफत आंदोलनाला मदत करून हिंदू-मुस्लिम ऐक्य प्रस्थापित करण्याचे गांधीजींचे स्वप्न यामुळे धुळीला मिळाले. मुल्ला मौलवींच्या तब्लीग आणि तंजीम (धर्मप्रसार आणि संघटना) या कडव्या धोरणाची प्रतिक्रिया म्हणून संघटन व शुद्धी आंदोलने सुरू झाली आणि त्या दशकात देशात अभूतपूर्व अशा जातीय दंगलीचे वातावरण उत्पन्न झाले.
 
 
 
 
खिलाफत चळवळीच्या सुरुवातीला तिचे स्वरूप हे इंग्रजांच्या विरोधात जनआंदोलनाचे होते. इंग्रजांनी या आंदोलनाला दडपण्याची योजना आखली होती. त्यांनी सुरुवातीला या आंदोलनाच्या मोठ्या नेत्यांना जेरबंद केले. यानंतर या आंदोलनाचे नेतृत्व मुसलमानांच्या हाती गेले. मोपला मुसलमानांच्या हाती नेतृत्व गेल्यामुळे त्यांनी हिंदू जमीनदारांवर हल्ले करण्यास सुरुवात केली.
 
 
 
 
या चळवळीला जमीनदारांच्या विरोधात वेठबिगारांच्या बंडाचे स्वरूप प्राप्त झाले. मोपला मुसलमान हे हिंदू जमीनदार त्यांना देत असलेल्या अल्प मजुरीमुळे व त्यांच्या वेगळ्या धार्मिक परंपरामुळे त्यांच्यावर नाराज होते. केरळात असे बंड आधी देखील घडले होते. १८३६ आणि १८४९ साली झालेले असे बंड देखील फार मोठे होते, परंतु १९२१ मध्ये याला मोठे हिंसक स्वरूप प्राप्त झाले होते. मोपला मुसलमानांनी अनेक पोलीस स्टेशनाना आग लावली होती, सरकारी दौलत लुटली होती, इंग्रजांवर हल्ला केल्यानंतर त्यांनी हिंदूंवर हल्ला चढवला. यात केरळमधील मालाबार येथील एरनद आणि वल्लुवानद या तालुक्यांची परिस्थिती सर्वात भयंकर होती.
 
 
२० ऑगस्ट १९२१ चा दिवस हा केरळच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस म्हणून ओळखला जातो. याच दिवशी केरळच्या मलबार प्रांतात एका मोठ्या विद्रोहाला सुरुवात झाली होती. या विद्रोहाला मोपला विद्रोह म्हणून ओळखले जाते. असं म्हटलं जातं की या दंगलीत मलबारमधील मोपला मुसलमानांनी हजारो हिंदूंची हत्या केली होती. यावेळी हिंदू महिलांवर बलात्कार करण्यात आले होते. हजारो हिंदूंचे धर्मांतरण करून त्यांना मुसलमान बनवण्यात आले होते. येथे २० हजाराच्या जवळपास हिंदूंची हत्या करण्यात आली. तर याहून अधिक हिंदुंचं जबरदस्ती धर्मपरिवर्तन करण्यात आलं होतं. ऑगस्ट पासून चालू झालेला नरसंहार हा अनेक महिने चालला, ऑगस्ट मध्ये पहिल्यांदा १०० पेक्षा जास्त हिंदूंची घर रात्रीतून जाळली गेली, झोपेत असलेले हिंदू पुरुष, स्त्रिया आणि लहान मुलं ह्या धर्मांध लोकांनी जाळून टाकले.या जाळाजाळी मुळे हिंदूंमध्ये एक भय निर्माण झाले आणि काही हिंदूंनी घाबरून इस्लाम धर्म स्वीकारला. जसं पूर्वी पासून चालू होतं तसंच, एकतर इस्लाम स्वीकार नाहीतर मरा! साधारण १००० एक हिंदू इस्लाम मध्ये गेले पण काही निडर हिंदू हे ह्या मोपलांच्या विरोधात उभे होते. पण त्यांना थोडं माहित होतं की पुढे जाऊन ते अश्या गोष्टीला सामोरे जाणार आहेत जी त्यांनी त्यांच्या वाईटातल्या वाईट स्वप्नामध्ये सुद्धा पाहिली नसेल.. 
 
 
२४ ऑगस्ट १९२१ ला थुवूर गावाच्या जवळ एका टेकडीवर जवळपास ४००० इस्लामिक धर्मांध लोक गोळा झाले, त्या वेळेला यांचे नेतृत्व करत होता चम्ब्रासेरी इम्बईची कोया थंगल. त्याच टेकडीवरील एका झाडाखाली जवळपास ४० लोकांना घुडग्यावर बसवले गेले, त्यांचे हात पाय बांधलेले होते, या ४० लोकांना शिक्षा सुनावली जाणार होती,का? कारण हे हिंदू होते आणि ह्या धर्मांध लोकांच्या विरुद्ध ह्यांनी आवाज उठवून काही प्रमाणात इस्लामिक राजवट मलबार मध्ये आणण्यापासून रोखले होते. संपूर्ण ४००० लोकांसमोर यांच्यावर असलेले आरोप मोठ्याने बोलून दाखवले गेले आणि एक एक करत यांना मारायला सुरवात केली. पहिल्या तीन लोकांना जागेवर गोळ्या घालून ठार मारण्यात आले, पण पुढच्या सदतीस लोकांची हत्या ही अक्षरशः भयानक रित्या केली गेली. टेकडीजवळ असलेल्या एका विहिरीजवळ एकेकाला नेले गेले आणि त्यांना एका दगडावर बांधले गेले आणि कत्तल करणाऱ्या नराधमाने त्यांची मुंडकी उडवायला सुरवात केली. मृत झालेल्या व्यक्तींचे शव हे ह्या विहरीत फेकले गेले. काही जणांच्या मुंडक्यावर पूर्ण वार बसला नाही आणि त्यांना अर्धमेल्या स्थितीत त्या विहिरीत फेकले गेले. त्या विहिरीत पाणी नव्हते, खाली फक्त दगडं होती आणि वरती येण्याला कोणताही मार्ग नव्हता, अश्यात जे अर्धमेले लोक होते, ते कसेबसे करत तीन दिवस जिवंत राहिले. जे लोक त्या विहरी जवळून जात होते त्यांना मदतीची हाक ऐकू येत होती पण ह्यांना मदत केली तर आपली पण अशीच अवस्था होईल म्हणून लोकांनी घाबरून विहरीत पडलेल्या लोकांना मदत केली नाही.
 
 
 
 
 
ह्या प्रसंगाने संपूर्ण मलबार गावात एक भयाचे वातावरण निर्माण झाले आणि येत्या काळात वारियन कुन्नाठु कुंजाहमद हाजी याने या मोप्लाह हत्याकांडाचे नेतृत्व घेतले.
 
 
जवळपास २५०० हिंदू स्त्रिया आणि मुलं या प्रसंगी मारली गेली, गरोदर स्त्रियांच्या पोटात चाकू खुपसून मारण्यात आले आणि त्यांचे शव हे रस्त्यावरच तसेच पडलेले होते, लहान बाळांना सुद्धा ह्या नराधमांनी सोडलं नाही! बायकांवर बलात्कार झाले आणि जवळपास ३०००० हिंदूंना बळजबरी इस्लाम स्वीकारायला भाग पडले गेले.
 
 

जिहादमध्ये नेहमीच होणार्‍या क्रौर्याचा पुढील कित्ता मोपला जिहादात गिरविण्यात आला

  • महिलांचा पाशवी विनयभंग
  • जिवंतपणे कातडी सोलवटून काढणे
  • पुरुष, महिला आणि मुलांची घाऊक हत्या
  • संपूर्ण कुटुंबांना जिवंत जाळणे
  • हजारो लोकांना बळाने बाटवणे आणि तसे करण्यास नकार देणार्‍यांना ठार मारणे
  • अर्धमेल्या लोकांना विहिरींत फेकून देणे, जेणेकरून वेदनांपासून मृत्यू सुटका करेपर्यंत पीडित लोक निसटून जाण्यासाठी तासनतास तडफडत
  • प्रभावित क्षेत्रातील बरीच हिंदू आणि ख्रिस्ती घरे जाळणे आणि जवळजवळ सर्व घरे लुटणे ज्यात मोपला महिला आणि मुलांचाही सहभाग, महिलांच्या अंगावरील कपडेदेखील ओरबाडून घेणे, थोडक्यात सर्व मुस्लिमेतर जनतेला भिकेला लावणे
  • प्रभावित क्षेत्रातील अनेक मंदिरे नष्ट आणि भ्रष्ट करून, मंदिरांच्या आवारात गोहत्या करून नि पवित्र मूर्तींवर गायींची आतडी ठेवून नि कवट्या भिंतीवर व छतांवर ठेवून हिंदूंच्या धार्मिक भावनांचा दुष्टपणे अपमान.
 
पण पुढे ही चळवळ चिरडून टाकण्यात आली. या आंदोलनाचा मुख्य नेता म्हणून ‘अली मुसलियार’ प्रसिद्ध होता.
 
 
आणि तशात पुढील काही काळात राजकीय वक्तव्य देशातल्या तथाकथित बड्या नेत्याकडून आली.. 
 
 
हा प्रसंग जितका भयानक आहे त्याहून भयानक या पुढच्या गोष्टी आहे, या हत्याकांडावर गांधीजी एकच वाक्य म्हणाले,“MY MUSLIM BROTHERS HAVE GONE MAD” अहिंसेचे पुरस्कर्ते असलेले गांधीजीनी यावर कोणतेही आंदोलन केले नाही अथवा हिंदूंच्या बाजूने एकही शब्द बोलले नाहीत उलट त्यांनी हा प्रसंग ब्रिटिशांविरुद्धची चळवळ आहे असे सांगून तुष्टीकरणाचे राजकारण केले.
 
 
आर्य समाजाने या धर्मांतर झालेल्या हिंदूंचे शुद्धी चळवळीच्या माध्यमातून पुन्हा शुद्धीकरण केले व त्यांची घर वापसी केली होती. या शुद्धी चळवळीचे अग्रणी होते स्वामी श्रद्धानंद ज्यांची २३ डिसेंबर १९२६ रोजी राशीद खान नावाच्या मुसलमानाने दिल्लीत गोळ्या घालून हत्या केली होती. त्या राशिदचे देखील गांधींनी एक प्रकारे समर्थनच केले. 
 
 
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ‘PAKISTAN or THE PARTITION OF INDIA ‘ या पुस्तकात, चॅप्टर नं.३ च्या तिसऱ्या भागात गांधीजींच्या ह्या दुतोंडीपणावर घणघणती टीका केलेली आहे आणि ते या प्रसंगाला “INHUMAN UNCONTROLLED SAVAGERY ‘ असं म्हणून संबोधतात. पुढे जाऊन ANNIE BESANT यांनी या इस्लामिक धर्मांधांवर जोरदार टीका केली. त्यात त्या म्हणाल्या ‘इस्लामिक राजवट भारतात आणि भारतातील लोकांना काय करू शकते हे आपल्याला मलबार प्रसंगातून दिसले आहे. असे कुठेही घडू नये याची पूर्णपणे काळजी घ्यावी आणि अश्या धर्मांध लोकांना वेळेस शिक्षा देण्यात यावी’.
 
 
परंतु जेव्हा केरळ मध्ये १९५७ ला इ एम स दिरीपाड यांच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट सत्ता स्थापन झाली तेव्हा ह्या मलबार हत्याकांडात ज्यांनी म्हणून भाग घेतला होता त्यांना ह्या सरकारने पेन्शन चालू केले.
 
अली मुसलियार, वारियनकुन्नथ कुंजाहमद हाजी आणि कोया थंगल यासारख्या अनेक मुस्लीम नेत्यांनी स्वतःला खिलाफत राजा किंवा राज्यपाल म्हणवून हिंदूंचा नरसंहार घडवून आणला. पैकी कुंजाहमदला ‘महानायक’ ठरवून त्याच्यावर सध्या केरळमध्ये अनेक चित्रपट बनत आहेत. भारतातील शाळेत शिकविण्यात येणाऱ्या इतिहासातील पुस्तकांत खिलाफत आंदोलनाला भारतीय स्वतंत्रता आंदोलनाशी जोडण्यात आले आहे, परंतु हे आंदोलन राष्ट्र्विरोधीच नाही तर हिंदू विरोधीही होते.
 
 
मोपला बंडाला प्राप्त झालेले हिंदू विरोधी दंगलीचे स्वरूप हे स्वातंत्र्यता आंदोलनाला सुरुंग लावण्याचे ब्रिटिशांचे प्रयत्न होते, असं अनेक डावे इतिहासकार मानतात. परंतु स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी या मोपला दंगलीवर ‘मोपल्याचे बंड’ असे पुस्तक लिहले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील आपल्या पाकिस्तान या ग्रंथात या दंगलीच्या वेळी घेतलेल्या सावध भूमिकेमुळे महात्मा गांधींवर टीकास्त्र सोडले आहे.
 
 
मोपल्याची दंगल ही हिंदुत्ववादी चळवळीच्या उदयाचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेमागील एक कारण असल्याचे अनेक इतिहासकार मानतात. एकंदरीत वेगवेगळ्या दृष्टीकोनातून बघितले तरी या दंगलीला भारताच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे, हे नाकारता येत नाही. 
 
 
केरळमध्ये या मोपला दंग्याची चर्चा आजदेखील केली जाते. केरळमधील हिंदुत्ववादी या दंगलीवरून आजदेखील तिथल्या कम्युनिस्ट कार्यकर्त्यांवर राजकीय टीकास्त्र सोडत असतात. मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील प्रचारादरम्यान केरळच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षावर भाजपाने कडाडून हल्ला चढवला होता. केरळच्या भाजपा अध्यक्षाने याला हिंदूंच्या विरोधात मुसलमानांचा पहिला जिहाद म्हटले होते.
 
 
दुर्दैवाने ह्या संपूर्ण प्रसंगाला आपल्या देशातल्या इतिहासकारांनी आणि नेत्यांनी तुष्टीकरणाच्या राजकारणापोटी, मलबारचे ब्रिटिशांविरुद्धचे बंड म्हणून संबोधले आणि हा संपूर्ण हिंदूंचा नरसंहार पुसून टाकला. असे अनेक अनेक प्रसंग आहेत ज्यात धर्मांध लोकांमुळे हिंदूंना स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. दुर्दैवाने हिंदूंना शिव्या घालणारे लोक सोईस्कररित्या मलबार, काश्मीरमध्ये झालेल्या लाखो हिंदूंचे हत्याकांड विसरून जातात. 
 
 
मोपला जिहादला आर्थिक कारणे असती, तर मग हिंदूंची बाटवाबाटवी करण्याचे, त्यांची मंदिरे भ्रष्ट करण्याचे काय कारण होते? जिहादला मजहबी रंग नव्हता असे म्हणणे आहे ना? मग मंदिरे पडत असताना मशिदी कशा शाबूत राहिल्या? बरे, स्वतः खून पाडणार्‍यांनी आपल्या कृत्यांमागील आपल्या इस्लामी प्रेरणांना कधी सेक्युलर मुलामा दिला नाही. वैचारिक दहशतवादात सर्वप्रथम पायदळी तुडविले जाते ते सत्याला ! मोपल्यांनी केलेला नंगानाच बंड किंवा विद्रोह होता असे म्हणणे सत्याचा अपलाप आहे. तो शुद्ध इस्लामी जिहाद होता, हे सांगायला संकोच कसला?
 
 
@ यशवंत मराठे 
yeshwant.marathe@gmail.com
 

Leave a comment



Rajendra Phadke

2 years ago

गांधींना महात्मा का म्हणू नये, याची जी अनेक कारणे आहेत त्यातले एक सुरुवातीचे महत्वाचे कारण, म्हणजे मोपल्यांचे बंड. मुस्लिम तुष्टीकरण करताना गांधी कोणत्या थराला जात, ह्याचे हे जळजळीत उदाहरण आहे.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS