sarmisal-b

A concise mixture of thoughts, ideas & concepts in an analytical yet humorous style.

chapaai

मला तुमच्याबरोबर शेअर करताना अत्यंत आनंद होत आहे की माझे पहिले पुस्तक, छपाई ते लेखणी, माझ्या षष्ट्यब्दीपूर्तीचे औचित्य साधून, काल ग्रंथालीच्या मार्फत प्रकाशित झाले. कालनिर्णयचे जयराज साळगावकर यांच्या शुभहस्ते प्रकाशन झाले हा दुग्धशर्करा योग. पुढील एक दोन दिवसात ऑनलाईन विक्री सुरु होईल. पुस्तकाचे कव्हर बघून बऱ्याच लोकांना कळणार नाही की ही नक्की काय संकल्पना आहे.

माझ्या करियरची सुरुवात आमच्या म्हणजेच मराठे उद्योग समूहाच्या प्रिंटिंग मशीन उत्पादन करणाऱ्या कंपनीपासून झाली. त्यामुळे छपाई ते लेखणी हा माझा एक प्रकारे आयुष्याचा प्रवास आहे. CMYK हे बहुरंगी प्रिंटिंगमध्ये वापरले जाणारे मूलभूत रंग आहेत. त्यांचा अर्थ Cyan(Blue), Magenta (Red), Yellow आणि Black (K) असा आहे. तुमच्या माहितीसाठी कॉम्पुटर स्क्रीनमध्ये मूलभूत रंग RGB (Red, Green & Blue) असे असतात. आता Y हा Yellow प्रमाणे माझ्या नावाचे आद्याक्षरही असल्यामुळे त्याला पेनाची नीब बनवून डिझायनरने कल्पकतेची कमाल केली आहे.

ज्यांना पुस्तक हवे असेल त्यांनी आपली कॉन्टॅक्ट डिटेल्स कळवा ज्यायोगे ऑनलाईन लिंक पाठवता येईल.

धन्यवाद

यशवंत मराठे

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS