बर्फाचा गोळा ते सागरी सेतू - १

शिवाजी पार्कच्या गप्पा

जन्मापासून आजतागायत ह्याच परिसरात वाढलो, मोठा झालो त्यामुळे मी ह्या परिसराचा नैसर्गिक आणि स्थायी नागरिक आहे असे ठामपणे म्हणू शकतो.. लहानपणापासून जी आठवण आहे त्यानुसार प्रामुख्याने मध्यमवर्गीय लोकवस्ती असलेला हा परिसर.. झकपक रेस्तराँ, फाईव्ह स्टार हॉटेल्स, पब्स, multiplexes तेव्हा नव्हती आणि आताही फारशी नाहीत..

पुढील काही लेखांमधून माझे स्वानुभव मी शेअर करण्याचा एक प्रयत्न करणार आहे.. मला कल्पना आहे की सध्याची नवीन पिढी त्या अनुभवांशी कदाचित समरस होणार नाही परंतु त्यांना एक प्रकारे भूतकाळात डोकावण्याची संधी मिळेल ज्यायोगे ५० वर्षांपूर्वींपासूनचे जीवनमान कसे आणि काय होते याची एक चुणूक किंवा झलक मिळू शकेल.. हे लिखाण मी इंग्रजीत पण करणार आहे ज्यामुळे मी जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेन..

आता मी जर ह्या परिसरातील महत्वाच्या काय खुणा होत्या असा जर विचार केला तर असे लक्षात येते की तशा त्या फारच थोड्या होत्या.. शिवाजी पार्क आणि त्यातील जिमखाना हे प्रसिद्ध असणे अतिशय स्वाभाविक होते कारण एक प्रकारे ते मुंबई क्रिकेटचे, किंवा खरं म्हणायचे तर भारतीय क्रिकेटचेच माहेरघर म्हणावे लागेल.. १९७० च्या दशकात मुंबईचा दबदबा क्रिकेटमध्ये एवढा होता की मला आठवतंय १९७२-७३ साली एका टेस्ट मॅचमध्ये ११ पैकी ७ ते ८ खेळाडू मुंबईचे होते.. इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या नसानसातून क्रिकेट धावत असे..

शिवाजी पार्क ही ह्या परिसराची ऑक्सिजन देणारी हिरवळ आहे.. गेली ५० वर्षे तिथे सकाळ, दुपार, संध्याकाळ किंवा रात्र, काहीही असो, तिथे चालणारे, धावणारे लोक दिसतातच.. तसेच थोड्या थोड्या अंतरावर बसणारे ग्रुप्स - सिनियर सिटिझन्स, तरुण मुलं-मुली, मित्रांचे अड्डे, कपल्स ही तर असतातच.. हा कधीही न झोपणारा पार्क आहे असे म्हटले तर वावगं होणार नाही..

आणि मग माझी शाळा - बालमोहन विद्यामंदिर.. शिक्षण महर्षी (सर्वार्थाने सद्य सम्राटांपेक्षा उत्तुंग असलेले) कै. दादासाहेब रेगे यांनी संस्थापित केलेली मराठी शाळा.. त्या शाळेत व्यतीत केलेली १२-१३ वर्षे ही माझ्या आयुष्यातील सोनेरी पानेच आहेत.. या शाळेची कीर्ती अशी होती की आमच्या सोसायटीत राहणारी अमहाराष्ट्रीय मुले सुद्धा इतर दुसऱ्या शाळेचा विचार न करता बालमोहनकर झाली..

वीर सावरकर मार्ग (कॅडल रोड) आणि कटारिया मार्ग यांच्या जंक्शनवर असलेली आलिशान वास्तू म्हणजे नातू बंगला.. वस्त्रोद्यय व्यवसायातील यशस्वी उद्योजक यांची टोलेजंग वास्तू, जिथे आज आसावरी बिल्डिंग आहे ती जागा.. आऊटहाऊस आणि स्टाफ क्वार्टर असलेला एक दिमाखदार बंगला..

तसेच खूप जुन्या म्हणून माहित असलेल्या बिल्डींग्स म्हणजे लोकमान्य नगर, रामबाग, अल्ट्रा आणि गुडविल अस्यूरन्स.. त्या तुलनेत १९७७ साली उभे राहिलेले सेना भवन तसे नवीनच.. आणि त्या काळी ह्या परिसरात बरीच सिनेमा थिएटर्स आणि इराणी कॅफे तर होतीच परंतु त्याबद्दल आपण विस्तृतपणे नंतर बोलूच..

आणि हो, हिंदुजा हॉस्पिटल, जेव्हा ते नॅशनल हॉस्पिटल म्हणून ओळखले जायचे.. ह्या परिसराबाहेरील लोकांना अजिबात माहित नसलेले हॉस्पिटल.. मुंबईतील दुसऱ्या भागातून जेव्हा इथे यायचे असे तेव्हा टॅक्सी ड्राईव्हरला नक्की कुठे जायचंय हे सांगताना नाकीनऊ यायचे.. पण तशी त्यांचीही काही फार चूक नव्हती कारण तेव्हा हॉस्पिटलची एक छोटी बैठी बिल्डिंग होती.. १९८० साली एका दुर्दैवी घटनेमुळे त्या हॉस्पिटलला खूप प्रसिद्धी मिळाली.. ३१ जुलै १९८० रोजी प्रथितयश पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचे निधन या हॉस्पिटलमध्ये झाले आणि दुसऱ्या दिवशी सर्व वर्तमानपत्रात त्याचे नाव झळकले आणि मला खात्री आहे की याच्या आधी कधीही त्यांना एवढी प्रसिद्धी मिळाली नसावी.. आम्ही मित्र सुद्धा आपापसात बोललो की, अरे यार आपल्या नॅशनल हॉस्पिटल नाव सर्व ठिकाणी झळकले..

पुढच्या झलकीत मी तुम्हाला माझ्या शालेय जीवनातील काही प्रातिनिधिक गंमती सांगीन, तोवर जरा थोडी कळ काढा..

यशवंत मराठे

#shivajipark #memories #childhood

Leave a comment



Sadhana Sathaye

7 years ago

Yesss.... this is how even I connect to Shivaji Park... childhood memories of swimming, cycling, jogging, badminton, samarth vyayam Mandir ...very much responsible for our overall development into a healthy social personality... I owe it all to this area. Can’t wait to read further... 😊👌

Sheetal Kulkarni

7 years ago

मस्त लिहलंय.. प्रत्येक मुंबईकराला दादरबद्दल एक प्रकारचा जिव्हाळा असतोच, त्यातून शिवाजी पार्क म्हणजे टिपिकल महाराष्ट्रीयन वातावरण..पुढील लेखाची वाट पाहतेय .. शुभेच्छा =)

Deepak Dandekar

7 years ago

Excellent article Yashwant . Look forward to the next one. Keep it up👍👍👌👌

सुनील सावंत

7 years ago

खूप छान, शिवाजी पार्कशी माझा जिव्हाळा लग्ना नंतर वाढला, तुमची ओघवती भाषा विशेष लक्ष वेधून घेते.

Madhuri Gawande

7 years ago

A very nostalgic blog it’s just wonderful to walk this memory lane 💕

V V vaidya

7 years ago

Quite interesting.
Pl provide details like year with photos.
Good luck.
Virendra

डॉ. शरद महाले

7 years ago

शिवाजी पार्क अनेक कारणांनी प्रसिद्ध होते आणि आहे. हाय कोर्टाने अनेक वेळा निर्णय दिले. त्यामुळे आजही शिवाजी पार्क टिकून आहे. अनेकांच्या वैयक्तिक आठवणी शिवाजी पार्कशी निगडीत आहेत. दादरच्या प्रत्येक व्यक्तीला शिवाजी व्यतिरिक्त मुंबई ही कल्पना सहन होणार नाही. शिवाजी पार्क, आंबेडकर स्मारक ( चैत्यभूमी) महापौर बंगला, सावरकर स्मारक, सिद्धिविनायक मंदिर हे सर्व मराठी मुंबईची माहेर घरे आहेत. शिवाजी पार्क वर न खेळलेला, किंवा न बसलेला (हवा खाण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी, सभा ऐकण्यासाठी) मुंबईतला माणूस शोधून सापडणार नाही...... . शरद महाले

Shubhada jahagirdar

7 years ago

Dear yashwant,
Wonderful efforts. This article took me down my memory lane. Why no mention of CITIZEN COOPERATIVE SOCIETY ? Wish you all the best.

Jitu Chitre

7 years ago

Khoop chaan !!! I am missing my Shivaji Park
Balmohan !!

Keep writing . I am eagerly waiting for next one

Jitu Chitre

7 years ago

Move ans pick chi Franky
Balmohan Sanju cha batata Vada
Shivaji Park cha bhaji Pav
Gandhi swimming pool
Hola ram che pedhe
Dattarya chi thali
Prakash chi misal Ani sabudana Vada

D A Patwardhan

4 years ago

Link to Audio file for above blog
https://soundcloud.app.goo.gl/PjAeWruNVwsLemxP6

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS