दुचाकी वाहने - शहरांचा शाप

तीस पस्तीस वर्षांपूर्वी मुंबईत टू व्हिलर्स खूपच कमी दिसायच्या आणि पुण्याला वगैरे गेलं की तिकडची दुचाकी वाहनांची गर्दी बघून दडपण यायचे. वाटायचं की बरं आहे की मुंबईत अशी गर्दी नाही. त्यावेळी असेही म्हटले जायचे की मुंबईतील ट्रॅफिकचा वेग बराच जास्त असल्याने दुचाकी वाहने कमी आहेत आणि राहतील.

परंतु हळूहळू अशी वाहने मुंबईत वाढू लागली. हिरो, बजाज, होंडा, कायनेटिक, टीव्हीएस, यामाहा अशी नुसती रेलचेल आहे. आता गेल्या पाच वर्षात तर दुचाकींची धुमश्चक्री झाली आहे. जशी ही वाहने वाढतायेत त्याच प्रमाणात मुंबईतील ट्रॅफिक दिवसेंदिवस बेशिस्त होऊ लागला आहे.

प्रत्येक शहरातील लोकांना असे वाटत असते की आपल्या शहरासारखा वाईट ट्रॅफिक भारतातील कुठल्याच शहरात नसणार. पूर्वी मला असा अभिमान होता की मला मुंबईच्या ट्रॅफिकबद्दल कधीच असे वाटणार नाही पण गेल्या २-३ वर्षात त्या अभिमानाच्या पार चिंधड्या झाल्या आहेत. आणि त्याचे प्रमुख कारण ही दुचाकी वाहने आहेत.

ट्रॅफिकचे कुठचेही नियम पाळण्यासाठी असतात याच्यावर या चालकांचा विश्वासच नसावा बहुदा. सगळ्या गोष्टी घाब्यावर बसवणं हा यांचा लाडका छंद. स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरावे हे सुद्धा यांना मान्य नाही; दहा वेळेला पोलिसांनी त्यासाठी अडवले तरी चालेल पण मी हेल्मेट घालणार नाही हा अट्टाहास. हेल्मेट न घालण्यासाठी पुण्यात आंदोलने होतात. कशासाठी यांच्या सुरक्षेचा विचार सरकारने आणि पोलिसांनी करायचा? होऊ देत अपघात. शंभर लोक मरतील तेव्हा कदाचित यांचे डोळे उघडतील आणि नाही उघडले तर मरू देत.

(फोटो सौजन्य: जयेंद्र साळगावकर, स्थळ: टिळक ब्रिज, मुंबई)

हल्ली मुंबईत तर ही दुचाकी वाहने काय करतील याचा नेमच राहिलेला नाही. कुठलाही रस्ता आणि रस्त्याची कुठचीही बाजू यांच्या बापाचीच असावी अशा थाटात सगळा कारभार चालू असतो. नो एन्ट्रीचे बोर्ड यांच्यासाठी नसतातच. कुठल्याही सिग्नलला थांबणे जणू अक्षम्य गुन्हाच. आपल्याला जायचा रस्ता जॅम आहे, काहीच अडचण नाही; घुसव विरुद्ध येणाऱ्या ट्रॅकमध्ये. फुटपाथवरून चालवणे हा तर यांचा जन्मसिद्ध हक्कच आहे. चालवताना फोन कानाला लावून मान वाकडी करून बोललो तर त्यात काय मोठं? माझी किती महत्वाची कामे असतात तुम्हाला काय कळणार? समोरची गाडी इंडिकेटर देऊन डावीकडे वळते आहे; माझा काय संबंध. मी तरीही त्या गाडीला डावीकडूनच ओव्हरटेक करणार. आणि जर काही बारीकसा जरी अपघात झाला तर मारामारी करायला लगेच तयार. जेवढी समोरची गाडी मोठी, तेवढी यांची जास्त दादागिरी.

त्याच्या व्यतिरिक्त प्रचंड वेगात चालवणे, ट्रीपल सीट जाणे, पोलिसांना हैराण करणे ह्या गोष्टी तर असतातच. जे जे हॉस्पिटलच्या ब्रिजवर दुचाकी वाहनांना परवानगी नाही पण मी माझ्या डोळ्याने बघितलंय की अडवणाऱ्या पोलिसाला बाजूला धुडकारून बेमुर्वतखोरपणे ब्रिजवर वाहने घालायची. दुसरा एक भयाण प्रकार म्हणजे रात्री या ब्रिजवर शर्यती लागतात. त्याशिवाय लांबच्या पल्ल्याच्या शर्यती रात्री असतातच. त्यावेळी ज्या वेगात वाहने चालवली जातात ते बघून सुद्धा अंगावर काटा येतो. जरा रिकामा रस्ता दिसला की ही मुले wheelie करतात.

ह्यात धर्माचा काही संबंध नाही पण असले सगळे अघोरी प्रकार करण्यात तरुण मुसलमान मुले सगळ्यात अग्रेसर आहेत. काही महिन्यांपूर्वी माझ्या घराजवळ दुचाकी वाहनांचे ४ दिवसात ३ जीवघेणे अपघात झाले आणि ७-८ तरुण मुसलमान मुले मृत्युमुखी पडली. खरंच आयुष्य एवढं स्वस्त झालंय की ज्याची कोणालाच पर्वा नाही?

हे सगळं कसं थांबणार? कठीण आहे कारण दिवसेंदिवस आम्हाला कायद्याची भीती वाटणेच बंद झाले आहे. बहुदा हे प्रकार वाढतच जाणार अशी आजची स्थिती आहे.

यशवंत मराठे

#traffic #TwoWheelers #helmets #wheelie #hero #bajaj

Leave a comment



Sadhana Sathaye

6 years ago

You said it!! It’s a menace😤

Anuja

6 years ago

Absolutely right. I challenge the traffic police to control this menace.

Ashok Prabhu

6 years ago

It's a big challenge to traffic department. Our NGO has felicitated Dahisar Traffic Asstt. Comissioner for organising two wheeler rally at BKC for their safety and it was biggest in the world . 11,800 Bikers participatated for which even Guinees Book of World Records has recognised the rally by issuing traffic deptt. for their successful attempt for the safety of bikers.
But all is in vain.
It is very frustrating but responsible citizen should make attempt to have a movement to stop this dangerous mania.

Hemant Marathe

6 years ago

What you have said is very true. Going triple seat, without helmet, on the wrong side of the road is very normal for them. By driving at high speed with all these traffic rule violations, they not only risk their own lives but also endanger the lives of innocent pedestrians.

पुष्कराज चव्हाण

6 years ago

खरं तर सामान्य जनतेला सोयीचं असतं म्हणून ते दुचाकी वाहन वापरतात. शहरात पार्किंगची समस्या फार मोठ्याप्रमाणात आहे त्यामुळेही दुचाकी वापरली जाते. शिवाय एकट्याने प्रवास करायचं तर त्यासाठी एवढी मोठी गाडी कशाला काढा? दुचाकी सोयीस्कर म्हणून ही वापरली जाते. मी असेही लोक पाहिले आहेत (बोहरी मुसलमान, मेमन) की ज्यांच्याकडे घरात प्रत्येकासाठी आलिशान गाडी आहे परंतु ते जवळच्या जवळ जाताना दुचाकीच पसंत करतात आणि दूर जायचं असेल तर लोकलट्रेनने जातात.
पूर्वी चारचाकी वाहन केवळ उच्चभ्रूंकडेच असे शिवाय त्यांना वाहतुकीचे नियम व सौजन्यशील वागणूक याचे भान रहात असे. शिवाय त्याकाळी वाहनांची संख्याही कमी होती. आता राहणीमान सुधारायला लागलं. बँका सहज कर्ज देऊ लागल्याने वाहन खरेदी सोपी झाली. ज्यांनी जीवनात आपण गाडी घेऊ याची स्वप्नात कल्पना केली नव्हती त्यांच्याकडे गाडी आली पण सुसंस्कृतपणा, सौजन्य या विकत घेता येण्याजोग्या नसल्या कारणाने वेष्टन बदलले पण आतला माल तोच या न्यायाने सुबत्ता आली पण माणूस तसाच राहिला. त्याचे परिणाम रस्त्यावरील बेशिस्त, मुजोरी, बेमुर्वतपणा, शिवीगाळ, मारामाऱ्या हे रस्त्यावर दिसण्यात झाले. वाहतुकीचे नियम न पाळणे हे भूषणावह आणि प्रतिष्ठेचं मानलं जाऊ लागलं. वाहतुक पोलिसाने गाड्या अडवणं हे अप्रतिष्ठा व अपमानास्पद समजलं जाऊ लागलं. त्यातून पोलीसांना शिव्या देणे त्यांना मारहाण करणे प्रसंगी गाडी अंगावर घालणे हे प्रकार सुरु झाले.
गाडी चालवणं हे बंदूक चालवण्या ईतकं गंभीर आहे हे सरकारला आणि जनतेला दोघांनाही मान्य नसावे असे वाटते. योग्य प्रकारे प्रशिक्षण देणे व घेणे ही प्रशिक्षक व चालक दोघांचीही असते तसंच परवाना देताना कठोर परीक्षा घेणं हे प्रशासनाचं काम आहे. प्रशिक्षक, चालक आणि प्रशासन या तीघांनीही योग्य प्रकारे आपली जबाबदारी पार पाडली तर रस्त्यावरील परिस्थिती कमालीची सुधारेल.
दोष दुचाकीच्या संख्येचा नसून सुसंस्कृत पणाच्या आणि योग्य प्रशिक्षणाच्या अभावात या सर्व समस्येचं मूळ दडलेलं आहे असं मला वाटतं.

Yogesh Dhaigude

5 years ago

Very well said Mr. Chavan. The problem is not with the numbers of two wheelers but with the person who is holding it's handle. Infact it is good to see more two wheelers than 4 wheelers but without internal cumbstion engine.

Vishakha Bhagvat

6 years ago

I think Indians by race are not disciplined at all. Indians believe that any rule has to be breached. Having said this, in our childhood people then born and nurtured in Mumbai were followers of rules including traffic rules. In my view migrant population has disturbed social fabric of Mumbai and this is the root cause of traffic chaos.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS