इस्लामी आक्रमणाचे बळी
(हा मूळ लेख "डॉ सर्गे ट्रिफकोविच" यांनी 'द न्यूयॉर्क टाईम्स' या वर्तमानपत्रात लिहिला होता. त्याचे मराठी शब्दांकन "मिलिंद गाडगीळ" यांनी केले जे 'जळगाव तरुण भारत' या वृत्तपत्रात दिनांक ६ मार्च २००३ रोजी प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर वीस वर्षे होत आली तरी परिस्थिती जैसे थे अशीच आहे म्हणून तो लेख मी कॉपी करत आहे ज्यायोगे तो सरमिसळच्या वाचकांसमोर येईल)
न्यूयॉर्क, दि. ५ - अमेरिकेतील डाव्या विचारसरणीचे विचारवंत आणि जगाच्या इतर भागातील डावे विचारवंत, असा दावा करीत असतात की, अमेरिकेने राजकीय इस्लामविरुद्ध चालविलेले युद्ध हे स्वतःवर ओढवून घेतलेले आहे. अमेरिकेने साम्राज्यवादी भूमिका घेऊन इस्लामला डिवचले. तसेच इस्लामला इस्राईलला चिरडून टाकण्यास मनाई केली. त्यामुळे हे युद्ध ओढविले आहे. परंतु वस्तुस्थिती अगदी वेगळी आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, १) इस्लामच्या राजकीय अंगाने गेली अनेक शतके इस्लामेतर जगाविरुद्ध युद्ध चालविले आहे. २) इस्लामने पाश्चिमात्य जगताशी आणि अमेरिकेशी संबंध नसलेल्या संस्कृतीविरुद्ध युद्ध चालविले आहे.
त्या संदर्भात भारतावर मुसलमानांनी केलेल्या आक्रमणाला विशेष महत्व प्राप्त होते. मुस्लिम आक्रमणापूर्वी भारत ही जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती होती. तत्वज्ञान, गणित आणि विज्ञान या क्षेत्रात भारतीय लोक खूपच पुढारलेले होते. शून्याचा शोध भारतानेच लावला. बीजगणित ही भारताचीच निर्मिती आहे. मुस्लिम आक्रमणापूर्वीचा भारत हा संपन्न आणि सर्जनशील होता. त्याची शिल्पकला विकसित होती. वास्तुकला नेत्रदीपक होती. परंतु आठव्या शतकाच्या प्रारंभी मुसलमानांनी भारतावर आक्रमण सुरु केले आणि पद्धतशीरपणे देवळे, शिल्पकला आणि राजप्रासाद यांचा विध्वंस केला. भारतातून महिला आणि बालके यांना लैंगिक शोषणासाठी अरबस्थानात नेले.
हिंसाचाराच्या या पहिल्या लाटेनंतर मोहम्मद बिन कासिमने सुव्यवस्था आणि सहिष्णुता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याने मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारताच त्याचा वरिष्ठ हज्जाज याने त्याला फटकारले. मोहम्मद हा कुराणाच्या आज्ञेनुसार वागत नसल्याची तंबी, हज्जाजने त्याला दिली. नंतर मोहम्मदला पाठविलेल्या एका संदेशात हज्जाजने असा आदेश दिला की, सर्व सुदृढ पुरुष ठार मारण्यात यावे. त्यांच्या बायका या भोगदासी बनविण्यात याव्यात. त्यांची अल्पवयीन मुले ओलीस ठेवावी. कासिमने त्याचा आदेश ऐकला आणि ब्राह्मणाबाद सर केल्यानंतर १६ हजार हिंदू पुरुषांची कत्तल केली.
या घटनेचे महत्व कत्तलीच्या संख्येत नाही. ती कत्तल करणारे लोक हे धर्मबाह्य वर्तन करणारे ठग नव्हते, तर उलट धर्माचे काटेकोरपणे पालन करणारे भाविक होते, या गोष्टीत आहे. धर्मयुद्ध लढणाऱ्या युरोपियन ख्रिस्ती योद्धयांनी गैरवर्तन केले, हे खरे. परंतु ते धर्मबाह्य वर्तन करणारे ठग होते. त्यानंतर ख्रिस्ती धर्माचा खूपच विकास झाला आहे आणि आता ख्रिस्ती धर्मपीठातून धर्मयुद्धाची शिकवण दिली जात नाही. परंतु इस्लामी धर्मपीठातून मात्र आजही जिहादची शिकवण दिली जाते. म्हणजे जिहाद हा मूठभर माथेफिरुंचा उन्माद नसून तो मुस्लिम समाजातील मुख्य विचारप्रवाह आहे.
कासिमच्या क्रौर्याची पुनरावृत्ती ११ व्या शतकात गझनीच्या मोहम्मदाने केली. मोहम्मदाने भारतावर सतरा स्वाऱ्या केल्या. त्याच्या स्वाऱ्यांबरोबर आलेला 'अल बरूनी' हा अरब इतिहासकार म्हणतो की, 'मोहम्मदाने भारताची संपन्नता नष्ट केली. त्याच्या असीम क्रौर्यामुळे हिंदू हे धुळीच्या कणांप्रमाणे चारही दिशांना उधळले गेले. ते नुसते पराभूत झाले नाहीत, तर त्यांच्या मनात मुसलमानांबद्दलचा तीव्र दोष रोवला गेला.
मुसलमान आक्रमकांची वक्रदृष्टी नंतर भगवान कृष्णाच्या जन्मस्थानाकडे म्हणजे मथुरेकडे वळली. अल बरूनी म्हणतो की, 'शहराच्या मध्यभागी श्रीकृष्णाचे भव्य मंदिर होते. त्याचे सौन्दर्य शब्दातीत होते. चित्र काढूनही ते सौन्दर्य प्रदर्शित करता आले नसते. मोहम्मदाच्या मते ते मंदिर बांधण्यास किमान २०० वर्षे लागली असावीत. मंदिरात पाच यार्ड उंचीच्या पाच सोन्याच्या मूर्ती होत्या. आणि त्यांचे नेत्र बहुमूल्य रत्नांनी जडविलेले होते. हे मंदिर जाळून टाकण्याची आणि त्याचे उरलेले अवशेष जमीनदोस्त करण्याची आज्ञा सुलतानाने दिली आणि ती अमलात आणली गेली.
प्रसिद्ध इतिहासकार "विल ड्युरांड" आपल्या 'दि स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन' या ग्रंथात म्हणतो की, 'वाराणसी, मथुरा, उज्जैन, महेश्वर, ज्वालामुखी आणि द्वारका या शहरात एकही मंदिर शाबूत उरले नाही. या विध्वंसाची तुलना एखाद्या सैन्याने पॅरिस, रोम, फ्लॉरेन्स आणि ऑक्सफर्डमध्ये शिरून तेथील वास्तुकलेचा विध्वंस केला असता तर त्याच्याशी करता आली असती. ही केवळ अराजकवादी मनोवृत्ती नव्हती तर त्यामागे सुसंकृत आणि सभ्य समाजाबद्दलचा तीव्र द्वेष होता.
इतिहासातील हा सर्वात रक्तरंजित अध्याय भारतात घडला.'
भारताच्या वायव्येकडील पर्वतांना हिंदुकुश म्हणतात. त्याचा अरबी भाषेत अर्थ 'हिंदूंचे शिरकाण' असा होतो. त्या काळात हजारो हिंदूंना गुलाम बनवून मध्य आशियात नेले जात होते. त्या प्रवासात अफगाणिस्तानातील दुर्गम भूमीत शेकडो नव्हे, हजारो हिंदू गुलाम मृत्युमुखी पडत असत.
गझनीच्या मोहम्मदाने सोमनाथमध्ये मंदिर तर उध्वस्त तर केलेच; परंतु ५० हजार हिंदूंची कत्तल केली. नंतर ११९३ मध्ये अहिंसेचा पुरस्कार करणाऱ्या बौद्धांची मोहम्मद खिलजीने कत्तल केली आणि त्याचा सेनापती बख्तियार खिलजी त्यांची नालंदा येथील ज्ञानसमृद्ध ग्रंथालये जाळून टाकली. १२ व्या शतकाच्या अखेरीस बिहारवर मुसलमानांचे राज्य प्रस्थापित झाल्यानंतर बौद्ध लोक हे नेपाळ आणि तिबेटमध्ये जीव वाचविण्यासाठी पळून गेले.
फिरोजशाह तुघलकने १३५१ मध्ये एका हिंदू सणाच्या दिवशी एका गावावर हल्ला केला. सर्वांची कत्तल केली आणि मंदिराचा विध्वंस करून तिथे मशीद बांधली. ही गोष्ट फिरोजशहाने आपल्या तवारिखित अत्यंत अभिमानाने नमूद केली आहे.
त्या तुलनेत मोगल बादशहा अकबर हा सहिष्णू म्हणावा लागेल. त्याच्या कारकिर्दीत फक्त एकदाच तीस हजार हिंदूंची कत्तल झाली. शहाजहानच्या काळात परिस्थिती पूर्वपदावर आली. शहाजहानच्या जनानखान्यात पाच हजार स्त्रिया होत्या. परंतु त्याने त्याचे समाधान होत नसे म्हणून तो आपल्या कन्या चमानी आणि जहाँआरा यांच्याकडून रतिसुख घेत असे. शहाजहानच्या अमदानीत बनारसमधील ७६ हिंदू मंदिरे नष्ट करण्यात आली. तसेच लाहोर आणि आग्रा येथील चर्चही जाळून टाकण्यात आली.
मुसलमान आक्रमकांनी हिंदुस्तानात केलेले अत्याचार हे ज्युईश होलोकॉस्ट, द सोवियत टेरर, दुसऱ्या महायुद्धात जपान्यांनी चिन्यांची केलेली कत्तल आणि नंतर माव झेडाँगने सांस्कृतिक क्रांतीत केलेल्या कत्तली यापेक्षा भयंकर आहेत. विसाव्या शतकात मानवतेविरुद्ध केलेल्या कोणत्याही नरसंहारापेक्षा भारतातील कत्तल भीषण आहे. दुर्दैव हे की, भारताबाहेर हे फारसे ठाऊक नाहीत. त्यामागे एक कारण ब्रिटिशांनी आपल्या राजवटीत मुस्लिम इतिहासाची केलेली रंगसफेदी आणि भारतातील आंधळ्या मार्क्सवाद्यांनी हिंदूंवर फोडलेले दोषांचे खापर हे आहे.
आजही जिहादवादी मुसलमानांच्या दृष्टीने भारत हा 'अनफिनिश्ड बिझिनेस' आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या राज्यकर्त्यांचे डोके ठिकाणावर असेल, तर जगात सुसंस्कृत आणि कायदा पाळणारा समाज हा भारतात आहे आणि अमेरिकेचा पहिला नैसर्गिक मित्र आहे, हे त्यांना कळेल.
दुर्दैवाने त्यांचे डोके ठिकाणावर नाही.
(डॉ सर्गे ट्रिफकोविच हे इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन विद्यापीठाचे डॉक्टरेट आहेत. त्यानंतर त्यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठातील हूव्हर इन्स्टिट्यूटमध्ये पोस्ट डॉक्टरल संशोधन केले).
मला दुर्दैवाने मूळ लेख इंटरनेटवर शोधता आला नाही. परंतु जळगाव तरुण भारत यात प्रसिद्ध झालेल्या लेखाची प्रत माझ्याकडे आहे.