Hindu Philosophy- Maria Wirth

I came across an article written by German Writer, Maria Wirth, about Hindu Philosophy and her learning. I felt that this article should be translated in Marathi so as to reach larger audience. The original article in English is also reproduced below after the Marathi version.

मराठी अनुवाद

हिंदू तत्वज्ञान

बरीच वर्षे भारतात राहून सुद्धा येथील काही गोष्टींचे मला आकलन होऊ शकत नाही. उदा. भारतीय बहुसंख्येने हिंदू असून सुद्धा चांगले शिकले सवरलेले भारतीय, भारताचा उल्लेख हिंदुराष्ट्र असा केल्यावर संतप्त का होतात? भारत हा त्याच्या हिंदू संस्कृती आणि परंपरेमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. भारताच्या या वैशिष्ट्यामुळेच पाश्चिमात्य लोक भारतात येत असतात. ही गोष्ट माहिती असूनसुद्धा अनेक भारतीयांचा भारताची हिंदुत्वाची परंपरा मान्य करण्यास का विरोध असतो? हिंदुत्वाचा अभिमान बाळगणारा भारत हा धोकादायक आहे अशी प्रतिमा काही लोक का निर्माण करतात? त्यांना जास्त कळतं का?

दोन कारणांसाठी मला हा दृष्टिकोन विचित्र वाटतो.

१) ह्या शिकलेल्या भारतीयांना इतर देशांना मुस्लिम राष्ट्र अथवा ख्रिश्चन राष्ट्र असे म्हटलेलं चालते परंतु भारताला हिंदू राष्ट्र म्हटले की यांचे डोके फिरते. उदाहरणार्थ जर्मनी हा धर्मनिरपेक्ष देश असून तेथील फक्त ५९% जनतेने आपण कॅथलिक किंवा प्रोटेस्टंट ख्रिश्चन चर्चचे अनुयायी आहोत असे नोंदलेले आहे. तरी देखील जर्मनीची गणना ख्रिश्चन राष्ट्रातच होते आणि ह्या गोष्टीला कोणी विरोध करत नाही. काही काळापूर्वी जर्मनीच्या चॅन्सलर श्रीमती एंजेला मार्केल ह्यांनी आपल्या ख्रिश्चन परंपरांचा गौरव करून लोकांनी परत आपल्या ख्रिश्चन मूल्यांचा स्वीकार करावा असा सल्ला दिला. इ.स. २०१२ मध्ये त्यांनी कॅथलिक दिवसानिमित्त राष्ट्राला संबोधित करण्यासाठी जी-८ च्या शिखर परिषदेला जाण्याचे पुढे ढकलले. जर्मनीतील मोठ्या दोन पक्षांच्या नावात ख्रिश्चन हा शब्द आहे. श्रीमती एंजेला मार्केल ह्यांच्या पक्षाचे नाव सुद्धा ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन असे आहे.

खरं तर जर्मन लोकं त्यांच्या देशाची गणना ख्रिश्चन राष्ट्र म्हणून केल्याबद्दल संतप्त झाले तर मी समजू शकते कारण चर्चचा इतिहास लज्जास्पद असाच आहे. ख्रिश्च्यानिटीची तथाकथित यशोगाथा जुलूम जबरदस्तीने भरलेली आहे. केवळ ५०० वर्षांपूर्वी अमेरिकेतील मूळवासियांपुढे धर्मांतर करा किंवा मरा असे दोनच पर्याय ठेवले गेले. १२०० वर्षांपूर्वी कार्ल द ग्रेट ह्या सम्राटाने नवीन पादाक्रांत केलेल्या प्रदेशातील बाप्तिस्मा करून घेण्यास नकार देणाऱ्या लोकांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली. त्यावेळी त्याचा सल्लागार, अलक्यूईन, उद्विग्न होऊन म्हणाला की, एक वेळ बाप्तिस्मा लादता येईल पण त्यांच्यावर विश्वास कसा लादता येईल? (कारण बाप्तिस्मा ही शारीरिक क्रिया आहे आणि विश्वास ठेवणे ही मानसिक क्रिया आहे).

सुदैवाने ख्रिश्चन मताला विरोध करण्यासाठी आयुष्य पणाला लावण्याचा काळ संपला आहे. आज अनेक पाश्चिमात्य मतभिन्नता प्रगट करतात व चर्च नाकारणाऱ्यांचा एक पंथ अस्तित्वात आहे. चर्चमधील अधिकाऱ्यांच्या अपवित्र वागणुकीबद्दल त्यांना घृणा वाटते आणि हे लोक (१) जिझसने दाखवलेला मार्ग हाच एकमेव मार्ग आहे आणि (२) जो ह्या शिकवणूकीवर विश्वास ठेवत नाही त्याला देव नरकात पाठवतो ह्या गोष्टी अमान्य करतात.

२) हिंदू धर्म हा अब्राहमप्रणित धर्मांपेक्षा वेगळ्या वर्गातील धर्म असून देखील सुशिक्षित भारतीयांचा भारताला हिंदुत्वाशी संलग्न करण्यास विरोध का असावा हे मला न सुटलेलं कोडं आहे. ख्रिश्चन आणि मुस्लिम (इस्लाम) धर्मांच्या इतिहासाशी तुलना केल्यास हिंदू धर्माचा इतिहास निश्चितपणे कमी प्रक्षोभक आहे. प्राचीन काळी हिंदू धर्माचा प्रसार जोरजबरदस्ती न करता आपली मते पटवून देऊन आणि मने जिंकून करण्यात आलेला आहे. हिंदू धर्माची विचारधारा आपल्या शिकाणूकीवर डोळे मिटून आणि बुद्धी गहाण ठेऊन विश्वास ठेवायला सांगत नाही किंबहुना हिंदू धर्म व्यक्तीला त्याची संपूर्ण बुद्धिमत्ता वापरण्यास प्रोत्साहन देतो. हिंदू धर्म म्हणजे शुद्ध अंतःकरणाने आणि बुद्धीने सत्याचा शोध घेणे हेच होय.

हिंदू धर्मात फक्त धर्माचे आणि तत्वज्ञानाचेच नव्हे तर संगीत, नृत्य, वास्तुशास्त्र (आर्कीटेक्चर), विज्ञान, खगोलशास्त्र, अर्थ आणि राज्यशास्त्र ह्यांचे प्रचंड मोठे ज्ञानभांडार आहे. जर्मनी किंवा कोणत्याही पाश्चिमात्य देशांकडे असे साहित्यिक ज्ञानभांडार उपलब्ध असते तर त्याचा त्यांना प्रचंड अभिमान वाटलं असता आणि त्याचा टेंभा मिरवला असता.

उदाहरण म्हणून सांगते, मी जेव्हा उपनिषदांचा अभ्यास केला तेव्हा मी विस्मयचकित झाले. मला जे प्रज्ञेच्या जोरावर सत्य वाटत होते पण व्यक्त करू शकले नव्हते तेच उपनिषदेत स्पष्ट शब्दात सांगण्यात आले होते. ब्रह्म हे अपूर्ण नसून चराचरात भरलेले अदृष्य, अविनाशी तत्व आहे. प्रत्येकाला अंतिम सत्य शोधण्याची परत परत संधी मिळत असते आणि तो त्याचा मार्ग निवडण्यास पूर्णपणे स्वतंत्र असतो. उपनिषदात मार्ग निवडण्यास मदत होईल अशा सूचना केलेल्या आहेत पण त्यांचा आग्रह धरलेला नाही.

माझ्या भारतातील सुरुवातीच्या काळात मला असे वाटत असे की प्रत्येक भारतीयाला त्याच्या उच्च भारतीय हिंदू परंपरेचे ज्ञान आहे आणि त्याला त्याचा अभिमान वाटत असणार. परंतु मला हळूहळू कळून चुकले की हा माझा गैरसमज होता. भारताच्या ब्रिटिश वसाहतवादी सत्ताधाऱ्यांनी यशस्वीपणे भारतातील उच्चभ्रु समाजाला ना केवळ त्यांच्या प्राचीन परंपरेपासून तोडले तर त्यांच्या मनात ह्या परंपरेविषयी घृणा निर्माण केली. त्याचा त्यांना असा फायदा झाला की, इंग्रजी शिक्षण घेतलेल्या समाज घटकाला मूळ संस्कृत ग्रंथ वाचता येईनासे झाले आणि तो समाज घटक इंग्रजांच्या सांगण्यावरती विश्वास ठेऊ लागला. तथाकथित पुरोगाम्यांचा हिंदुत्वाशी निगडित असलेल्या प्रत्येक गोष्टीला विरोध असण्यामागील कारण इंग्रजी शिक्षणाने केलेला बुद्धीभेद व अस्सल ज्ञानाची उणीव हे असावे असे मला वाटते. परंतु तथाकथित पुरोगाम्यांना एक महत्वाचा फरक लक्षात येत नाही तो असा की, पाश्चिमात्य धर्मात डोळे मिटून विश्वास ठेवावा लागतो (अंधश्रद्धा) किंवा अंगीकार केल्याचे भासवावे लागते. आणि हे धर्म त्यांच्या अनुयायांना स्वतः विचार करण्यावर अगदी बंदी जरी घालत नसले तरी त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत असतात. ह्या उलट बहुविध हिंदू धर्म स्वतःची बुद्धिमत्ता वापरण्यास प्रोत्साहन आणि स्वातंत्र्य देतो.

अनेक भारतीय बुद्धिवंतांना हे कळत नाही की, ह्या मोठ्या देशात ख्रिश्चन आणि इस्लाम पसरविण्याचे स्वप्न रंगवणारे लोक हिंदू धर्मावरती अप्रस्तुत टीका करणाऱ्यांचा उदोउदो करतील कारण त्यांच्या टीकेमुळे पाश्चिमात्य कल्पनांची मुळे रुजविण्यासाठी भुसभुशीत जमीन तयार होते. अशा वेळी अनेक पाश्चिमात्य, अगदी कडवे ख्रिश्चनसुद्धा हिंदू संस्कृतीचा मोठेपणा जाणून भारतीय ज्ञानभांडारातील गहन विचार गुपचूपपणे मूळ हिंदू उगमस्थान दडवून ठेऊन जणू काही हा आपलाच विचार आहे असे भासवितात किंवा हा विचार पाश्चिमात्यांना आधीपासूनच माहित होता असे प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करतात. पाश्चिमात्यांच्या ह्या, केवळ हिंदूंचीच असलेली अमूल्य ज्ञानसंपदा गिळंकृत करण्याच्या प्रवृत्तीमुळे शेवटी हिंदूंच्या टाकाऊ गोष्टी शिल्लक राहतात. इन्फिनिटी फाउंडेशनचे राजीव मल्होत्रा म्हणतात त्याप्रमाणे वैश्विकवादाच्या आवरणाखाली हिंदू संस्कृतीला गिळंकृत करण्याचा जो खेळ पाश्चिमात्य खेळत आहेत त्या खेळात भक्ष म्हणजे हरीण किंवा वरील संदर्भात हिंदू विचार, खाऊन टाकला जाऊन नष्ट केला जातो व तो पचवून (म्हणजे हिंदू विचार चोरून) खाऊन टाकणारा भक्षक म्हणजे वाघ जास्त ताकदवान होत जातो.

जर केवळ मिशनरीजनी हिंदू धर्मावरती अयोग्य टीका केली तर एवढे वाईट वाटण्याची गरज नाही कारण त्यांचा तोच एकमेव उद्देश आहे; हे विवेकी भारतीय समजू शकतात. परंतु दुःखाची गोष्ट अशी आहे की, हिंदू नावे धारण करणारे भारतीय त्यांना मदत करतात. त्यांचा असा दृढ विश्वास आहे की, हिंदुत्व हे पाश्चिमात्य धर्मापेक्षा हीन आहे. ते हिंदुत्वाचे संपूर्ण ज्ञान न घेताच हिंदुत्वाला कमी लेखतात. सर्वसाधारणपणे त्यांना त्यांच्या परंपरांविषयी जेवढे इंग्रजांनी शिकविले तेवढेच माहिती असते. उदा. हिंदू धर्मातील जाती व्यवस्था आणि मूर्तिपूजा. परंतु दुर्दैवाने त्यांना हे कळत नाही की, मूलभूत विचार देणाऱ्या व सर्वसमावेशक हिंदू संस्कृतीच्या मागे आपण जर ठामपणे उभे राहिलो तर भारताचे नुकसान होण्याऐवजी फायदाच होणार आहे.

काही काळापूर्वी दलाई लामांनी म्हटले होते की, तरुण वयात ल्हासामध्ये असताना भारतीय वैचारिक श्रीमंतीचा माझ्यावरती खोल ठसा उमटलेला आहे. ते पुढे म्हणतात की, जगाला मदत करण्याचे भारतामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे.

इंग्रजाळलेल्या भारतीय बुद्धीमंतांना ही अक्कल केव्हां येणार?

मरिआ विर्थ

(भारतीय तत्वज्ञानाची जर्मन अभ्यासक)

--------

--------

Original Article in English:-

Hindu Philosophy

Though I have lived in India for a long time, there are still issues here that I find hard to understand. For example, why do so many educated Indians become agitated when India is referred to as a Hindu country?

The majority of Indians are Hindus. India is special because of its ancient Hindu tradition. Westerners are drawn to India because of Hinduism. Why then is there this resistance by many Indians to acknowledge the Hindu roots of their country? Why do some people even give the impression that an India which valued those roots would be dangerous? Don’t they know better?

This attitude is strange for two reasons. First, those educated Indians seem to have a problem only with “Hindu” India, but not with “Muslim” or “Christian” countries. Germany, for example, is a secular country, and only 59 percent of the population are registered with the two big Christian churches (Protestant and Catholic). Nevertheless, the country is bracketed under “Christian countries” and no one objects. Angela Merkel, the Chancellor, stressed recently the Christian roots of Germany and urged the population “to go back to Christian values.” In 2012 she postponed her trip to the G-8 summit to make a public address on Katholikentag, “Catholics Day.” Two major political parties carry Christian in their name, including Angela Merkel’s Christian Democratic Union.

Germans are not agitated that Germany is called a Christian country, though I actually would understand if they were. After all, the history of the Church is appalling. The so-called success story of Christianity depended greatly on tyranny. “Convert or die” were the options given—not only some five hundred years ago to the indigenous population in America, but also in Germany, 1,200 years ago, when the emperor Karl the Great ordered the death sentence for refusal of baptism in his newly conquered realms. This provoked his advisor Alkuin to comment: “One can force them to baptism, but how to force them to believe?”

Those times, when one’s life was in danger for dissenting with the dogmas of Christianity, are thankfully over. Today many in the West do dissent and are leaving the Church in a steady stream. They are disgusted with the less-than-holy behavior of Church officials and they also can’t believe in the dogmas, for example that “Jesus is the only way” and that God sends all those who don’t accept this to hell.

The second reason why I can’t understand the resistance to associate India with Hinduism is that Hinduism is in a different category from the Abrahamic religions. Its history, compared to Christianity and Islam, was undoubtedly the least violent as it spread in ancient times by convincing arguments and not by force. Hinduism is not a belief system that demands blind acceptance of dogmas and the suspension of one’s intelligence. On the contrary, it encourages using one’s intelligence to the hilt. It is an enquiry into truth based on a refined character and intellect. It comprises a huge body of ancient literature, not only regarding dharma and philosophy, but also regarding music, architecture, dance, science, astronomy, economics, politics, etc.

If Germany or any other Western country had this kind of literary treasure, it would be so proud and highlight its greatness on every occasion.

When I discovered the Upanishads, for example, I was stunned. Here was expressed in clear terms what I intuitively had felt to be true, but could not have expressed clearly. Brahman is not partial; it is the invisible, indivisible essence in everything. Everyone gets again and again a chance to discover the ultimate truth and is free to choose his way back to it. Helpful hints are given but not imposed.

In my early days in India I thought every Indian knew and valued his tradition. Slowly I realized I was wrong. The British colonial masters had been successful in not only weaning away many of the elite from their ancient tradition but even making them despise it. It helped that the British-educated class could no longer read the original Sanskrit texts and believed what the British told them. This lack of knowledge & the brainwashing by the British education may be the reason why many so-called “modern” Indians are against anything Hindu. They don’t realize the difference between Western religions that have to be believed (or at least professed) blindly, and which discourage, if not forbid, their adherents to think on their own, and the multi-layered Hindu Dharma which gives freedom and encourages using one’s intelligence.

Many of the Indian educated class do not realise that those who dream of imposing Christianity or Islam on this vast country will applaud them for denigrating Hindu Dharma, because this creates a vacuum where Western ideas can easier gain a foothold. At the same time, many Westerners, including staunch Christians, know the value of Hindu culture and surreptitiously appropriate insights from the vast Indian knowledge system, drop the original Hindu source and present it either as their own or make it look as if these insights had already been known in the West. As the West appropriates valuable and exclusive Hindu assets, what it leaves behind is deemed inferior. Unwittingly, these Indians are helping what Rajiv Malhotra of Infinity Foundation calls the digestion of Dharma civilization into Western universalism. That which is being digested, a deer for example, in this case Hindu Dharma, disappears whereas the digester (a tiger) becomes stronger.

If only missionaries denigrated Hindu Dharma, it would not be so bad, as they clearly have an agenda which discerning Indians would detect. But sadly, Indians with Hindu names assist them because they wrongly believe Hinduism is inferior to Western religions. They belittle everything Hindu instead of getting thorough knowledge. As a rule, they know little about their tradition except what the British have told them, i.e., that the major features are the caste system and idol worship. They don’t realise that India would gain, not lose, if it solidly backed its profound and all-inclusive Hindu tradition. The Dalai Lama said some time ago that, as a youth in Lhasa, he had been deeply impressed by the richness of Indian thought. “India has great potential to help the world,” he added.

When will the Westernized Indian elite realize it?

Maria Wirth

यशवंत मराठे

#hinduism #hindutva #sanatan_dharma #philosophy #maria_wirth #christian #muslim #islam

Leave a comment



Ashok Prabhu

6 years ago

Her observations are very precise about so called intelligent class and their opinion about Hindutwa.
This issue has to be discussed on a larger platform. Anyway now people are accepting the truth and hope Hindutwa will reappear in Lydia.

Sujith Gokhale

6 years ago

Definitely thought provoking. It's a sad state of affairs, but a reality that we Indians are not at all proud of our rich cultural heritage and traditions and belittle everything without trying to understand the logic behind a lot of our traditions

aroundindiaghansham

6 years ago

याच कारण एखाद्या दलिताला विचारा. ज्यांच्यासाठी स्पेशल तुटके कप ठेवले जात असत त्यांना विचारा. आपल्या धर्माच्या देवाचे दर्शन घेण्याचाही ज्यांना अधिकार आजही नाही त्यांना विचारा.
धर्माची दोन रुपे असतात. एक धर्मग्रंथातील व दुसरा व्यवहारातील. आपला धर्मग्रंथातील धर्म जेवढा उदारमतवादी आहे, तेवढाच प्रत्यक्षातील धर्म कर्मठ आहे. ज्या धर्माला मुळातच व्यक्ती व्यक्तीमधील समानता मान्य नाही, तो धर्म सामाजिक जीवनात नाकारणेच योग्य ठरेल हे येथील बहुसंख्य देशवासियांना कळलेले आहे हा याचा अर्थ आहे. वरील लेखिकेने आजही हिंदु धर्मात शुंद्रांचे काय स्थान आहे, आणि त्यांची काय अवस्था आहे हे प्रत्य़क्षात पाहिले नसावे, ते पाहिले असते तर हा प्रश्न तिला पडला नसता.

Yeshwant Marathe

6 years ago

या अनिष्ठ प्रथा आपल्या समाजात काही प्रमाणात जरुर आहेत परंतु त्यात धर्माचा दोष नसून तो माणसाचा आहे. उदाहरण जर द्यायचे झालं तर आज वैद्यकीय क्षेत्रात अनेक वाईट गोष्टी होताना आपण बघतो, ऐकतो त्यामुळे काही डॉक्टर्स अनैतिक बाबी करतात म्हणून आपण संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र नाकारत नाही.

राहुल

6 years ago

"हिंदू धर्मात फक्त धर्माचे आणि तत्वज्ञानाचेच नव्हे तर संगीत, नृत्य, वास्तुशास्त्र (आर्कीटेक्चर), विज्ञान, खगोलशास्त्र, अर्थ आणि राज्यशास्त्र ह्यांचे प्रचंड मोठे ज्ञानभांडार आहे"

पण हा सर्व ज्ञानभांडार माणसांनीच समृद्ध केला मग हिंदू धर्माचे काय मूल्य त्यामध्ये?

का अनिष्ट प्रथा माणसांच्या आणि चांगल्या प्रथा धर्माच्या असा नियम आहे?

तेजस सुदाम केणी

6 years ago

महाराषट्रातले पांडुंरग शास्त्री आठवले यांचे प्रवचन ऐका
तुम्हाला जर खरच तुमचे प्रश्न सोडवायचे असतिल तर

Akash D.

6 years ago

Such a one sided blog.
I think she doesn't understand, India belongs to diversity which includes many different religions, their cultures/traditions.
Describing India as a Hindu country is going to make a civil war, which is already being done by many RSS, BJP members and she won't understand these interenal issues because she is a foreigner and don't forget, foreigners has destroyed/looted our peaceful country by creating racism, castism etc.

Yeshwant Marathe

6 years ago

I don’t think so

Ltm Tourisme

6 years ago

A perfect example of misunderstanding of Indian culture. India is diverse and pluriel. Reducing India culture to hindu culture is deleting 60% of Indian culture.
How come it’s possible to compare Germany with India? These two countries are nothing in commun.

Paridnya Puri

6 years ago

A beautifully written article and very apt as it summarises the current Indian scenario very well. It is true that Bhaarata is equivalent to Hindutva. Minus the Hindutva, nothing remains; then it's like any other Muslim or Christian country in the world. The uniqueness that India has is because of Hinduism. Only because of Hinduism, people of diverse beliefs and cultures can coexist peacefully. And yes, this is a country of Hindus and undoubtedly so! Applaud the author for her candidness.

unnatigadgil9677

6 years ago

फक्त हिंदू धर्मात च भेदभाव.. आहे.. सदोष चालीरीती.. आहेत असे नाही. प्रत्येक धर्मात भेदभाव आहेत.
धर्म हे मूळ कारण.. लढयांचे..
एक महत्त्वाचें म्हणजे.. हिंदू धर्म, जातीभेद, वर्ग.. वर्ण भेद.. .. यावर सहज टिका केली जाते.. .. कारण आपण गप्प बसून ऐकतो.. हेच बाकी धर्मावर टिका केली तर कडक नियमावलीला सामोरे जावे लागते.

मुळात.. धर्म... राजकारण... जात..।या विविषयावर.. चे अनाठायी भाष्य थांबवणे जरूर आहे.दुर्लक्ष करणे आवश्यक.
ते एख .. मत आहे.. सार्वमत नाही.

बाकी अनेक धर्मात .. त्रुटी आहेत भेदभाव आहेत.. अंधश्रद्धा आहे....
पण... उगाचच उणेदुणे काढले जाते....
दुसऱ्या धर्मातील कुसळ काढले जाते..
असो.

दुर्दैवाने आपली माणसे सुद्धा स्वधर्माची हेटाळणी करतात.. .. ते क्लेश दायक होय.

जगात कोणताही धर्म.... परिपूर्ण तत्त्वज्ञान सांगतो असे होत नाही..पण धर्माच्या आधाराने.... माणसाला थोडा धीर येतो.आधार मिळतो..
शेवटी.. स्वबुद्धीचा वापर करून.. .. जीवनाला सामोरे जावे लागते.
सद्सद्विवेक बुद्धी ला जागून सद्कर्म करणे महत्त्वाचे..।
उन्नती गाडगीळ💐

Yeshwant Marathe

6 years ago

फार सुंदर विचार. धन्यवाद

Prashna Naik

6 years ago

हिंदू धर्माविषयी लोकांमध्ये जागृति करणारा सुंदर लेख.

दीपाली

6 years ago

आज भारतात अनेक धर्माचे जातींचे लोक आहेत म्हणून भारत हिंदू राष्ट्र नाही असे म्हणणे म्हणजे इतिहास नाकारणे आहे .कारण येथील मूळ हिंदू लोकांच्या सर्वसमावेशक वृत्तीमुळेच बाहेरून आलेले इतर धर्मीय आपला धर्म न सोडताही इथे रुजू शकले.इतकेच नाही तर त्यांनी हिंदूंचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला.तरीही पाच हजार वर्षापूर्वीचा हा धर्म टिकून राहिला .मला वाटतं हेच वैशिष्ट्य भारताला जगात ओळख मिळवून देतं ,म्हणून भारत हिंदूराष्ट्र म्हण ण्यास काहीच हरकत नाही

Shivdas

6 years ago

निर्विवाद सत्य

Dr. Shrikant Deshpande

6 years ago

Hinduism is based on, 'Vasudev Kutumbakam' , (peaceful coexistence). We , Bharatiya are not inculcated of being patriotic, it is a distant dream to be proud of being a Hindu. How many Hindus support Vedic Pathshalas ? Forget learning vedic scriptures or children being encouraged to do so. Western Philosophy and practice of life has attracted the younger generation in Bharat. A strong will of revival is required.

I agree with the researcher.

The English education system has delivered loyal servants to work for the HM crown and erase our heritage of knowlege, culture and self esteem.

Ramesh Vijapur

6 years ago

Hinduism is a ocean of knowledge. We can't describe it precisely. Rules of nature and inner voice of God (consciousness) are dirrecting principles. Have courage to follow inner voice and spread it. No one need to teach. You can decide the good & the bad.

Ashok Munde

6 years ago

India is a country run by its constitution. Unity in diversity is our strength. We r in 21st century. Our neighbouring country China has made tremendous progress in science and technology and we r still playing religious politics. Need to focus on progress of the country. Becoz Nepal is only Hindu Country in the world and look where it stands and how Islamic countries like Bangladesh and Pakistan r suffering now a days

Dr Ajay Meshram

6 years ago

There’s no equality in so called Hinduism. Social disparity still prevails. So called upper castes only take advantage of lower castes. Lower castes only given some positions without power. Discussion from cities very easy. My desires should be fulfilled is the only vision of followers of Hinduism
Shudra Purvi kon hote book by Dr Babasaheb Ambedkar a must read

Rajesh Kothari

5 years ago

I wish readers would care to practice and study Sahaj Marg (now also known as Heartfulness) Philosophy and you will realise how nicely it allows one to transcend differences created by various faiths and ideologies; and brings hope of unity among human beings.

It’s not only a dream but slowly and steadily becoming reality. Once it reaches a critical threshold it has potential to transform humanity from the core. And in this utopian goal it is helped actively by divine powers including Yug Purusha of this time, Lord Krishna.

I only wish and pray that “openness” of Hinduism is embraced and practiced by my well meaning friends after a careful study; and they shall see the light.

Rajesh Kothari

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS