हे आहे महाराष्ट्राचे राजकारण..
एकच अपेक्षा की निदान तरुण पिढीने आता तरी हे सर्व लक्षात घेऊन कुठल्याच पक्षाचे भक्त होऊ नये किंवा कुठल्याच पक्षाचे वैरी होऊन वाद/भांडण करू नये. कारण हे राजकारणी कोडगे आहेत; त्यांना कशाचाही फरक पडत नाही.
कोण कोणत्या पक्षात जातो, कोण कुणाशी युती करतो आणि कोण सत्तेची फळे चाखतो यात आता सामान्य माणसाला शून्य रस उरला आहे कारण महाराष्ट्रातील सगळे राजकीय पक्ष समान चरित्रहीन आहेत आणि ते सामान्य लोकांना मूर्ख बनवत आहेत याची प्रत्येक नागरिकाला १०० टक्के खात्री पटली आहे..
पुढील विधानसभा निवडणुकीत ३५-४० टक्के च्या वर मतदान होणार नाही आणि भाजपाचा कट्टर हिंदुत्ववादी मतदार यावेळी मतदान करायला येईल याबद्दल अजिबात शाश्वती देता येणार नाही. गंमतीत बोलायचं म्हणजे जर पुढील काही महिन्यात काँग्रेसचा गट फुटून जर या सरकारमध्ये सामील झाला नाही, तर पुढील विधानसभा निवडणुकीत सगळ्यात जास्त संधी काँग्रेसला मिळेल असे मला वाटते
सगळेच जर नंतर एकत्र येऊन हातात हात घालून बागडणार असतील तर आपण आपण का मुर्खासारखे मतदान केंद्र शोधत, उन्हातान्हात उभे राहून घाम गाळत मतदानाचा हक्क आणि अधिकार बजावण्याचा वेडेपणा का करायचा? आणि नंतर बावळटासारखे नखाला लावलेल्या शाईचं बोट नाचवत फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायचे???
एकदा सांगा, की आम्ही मतदान करायचे आहे की तुम्ही आपापसातच ठरवणार आहात? कारण असे सगळेच पक्ष जर नंतर एकत्र येणार असतील तर आपल्यासारखे गाढव आपणच. आणि मग कोण जाईल यापुढे राज्याच्या मतदानाला?? आणि उद्या मतदान समजा कंपल्सरी केलंच तर "NOTA" चं बटन सगळ्यात बेस्ट उपाय.
आता नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी एकत्र आले म्हणजे आपण डोळे मिटायला मोकळे !
@ यशवंत मराठे