आज दीड वर्षानंतर काय परिस्थिती आहे?
केसेस - 3.40 कोटी आणि 4.5 लाख व्यक्ती मृत्युमुखी.
खरं तर बरखा दत्त आणि डॉ. रमणन लक्ष्मीनारायनन यांनी लोकांमध्ये तीव्र भीती पसरविल्याबद्दल माफी मागायला हवी. पण त्यांची कातडी गेंड्याची असल्यामुळे त्यांना काही फरकच पडत नाही.
आज सप्टेंबर अखेरीस काय परिस्थिती आहे?
65 कोटी लोकांना - लसीची एक मात्रा
आणि
25 कोटी लोकांना - दोनही डोस.
माझ्या मते मोबाईल फोनवरून शूटिंग करणे आणि आक्षेपार्ह अथवा संवेदनशील प्रसंगांचे प्रसारण करणे ह्यावर ताबडतोब कडक निर्बंध येणे जरूरीचे आहे. तुम्हाला आठवत असेलच काही वर्षांपूर्वी अमृतसर जवळील एका भयाण रेल्वे अपघातात शेकडो लोकं मृत्युमुखी पडली होती. पण आजूबाजूचे इतर लोक काय करत होते? जखमी लोकांना मदत करण्याऐवजी आपल्या मोबाईलवर अपघाताचे चित्रीकरण. वाहिन्यांच्या ब्रेकींग न्यूजचा आजार सर्वसामान्य माणसात देखील महामारी सारखा पसरला आहे. काही महिन्यांपूर्वी एका xxxx (कितीही मोठी शिवी कमीच होईल) गळा कापतानाचा व्हिडीओ व्हायरल केला होता. मनुष्य इतका क्रूर असेल यावर विश्वास बसत नव्हता. एखाद्या माणसाची झोप कायमची उडेल.