विकृती की आसुरी आनंद?

मला हल्ली अशी एक शंका येते की लोकांना कुठल्याही गोष्टीत चांगले दिसतच नाही का? 
 
काही दिवसांपूर्वी माझे मित्र सचिन परांजपे यांनी ऋषी कपूर आणि नितू सिंग यांचा एक अतिशय सुरेख फोटो टाकून माझं आवडतं कपल एवढंच बोलल्यावर त्यानंतर लगेच त्यांचे फसलेले वैवाहिक जीवन आणि मग दारुडा, मारहाण या गोष्टींवर लोकांच्या कमेंट्स. असे का? आपण इतके निगेटिव्ह झालो आहोत की जरी काही छान दिसलं तरी त्याची फक्त नकारात्मक बाजूच आपल्याला प्रकर्षाने जाणवते?
 
 
 
 
21 मार्च 2020 या दिवशी बरखा दत्त हिने डॉ. (PhD) रमणन लक्ष्मीनारायनन यांची मुलाखत घेतली होती. या अर्थशास्त्र्याच्या भाकितानुसार पुढील चार महिन्यात (म्हणजे जुलै 2020) भारतात 30 ते 50 कोटी कोरोनाच्या केसेस होतील आणि मरणाऱ्या लोकांची संख्या 10 ते 30 लाख असेल. त्यांचा असाही दावा होता की पुढील काही कालावधीत भारतातील सर्व 140 कोटी लोकांना कोरोना लागण होईल. 
 
 
 

आज दीड वर्षानंतर काय परिस्थिती आहे?

केसेस - 3.40 कोटी आणि 4.5 लाख व्यक्ती मृत्युमुखी.

खरं तर बरखा दत्त आणि डॉ. रमणन लक्ष्मीनारायनन यांनी लोकांमध्ये तीव्र भीती पसरविल्याबद्दल माफी मागायला हवी. पण त्यांची कातडी गेंड्याची असल्यामुळे त्यांना काही फरकच पडत नाही

 
 
डिसेंबर 2020 मध्ये भारत सरकारने ऑगस्ट 2021 अखेरीस 60 कोटी लोकांना कोरोना लसीची किमान एक मात्रा दिली जाण्याचे उद्दिष्ट जाहीर केले तेव्हा CNN या अमेरिकन न्यूज चॅनेलने भारताची खिल्ली उडवत हे उद्दिष्ट हास्यास्पद असल्याचे जाहीर केले. भारत हा एक विकसनशील देश असून त्याची आरोग्य व्यवस्था हे आव्हान पेलूच शकणार नाही. CNN च्या बातमीचे आपल्या वाहिन्यांनी अगदी कौतुकाने प्रसारण केले.
 
 

आज सप्टेंबर अखेरीस काय परिस्थिती आहे?

65 कोटी लोकांना - लसीची एक मात्रा

आणि

25 कोटी लोकांना - दोनही डोस.

 

आता CNN आणि आपल्या वृत्तवाहिन्या कुठल्या बिळात लपून बसल्या आहेत? कोरोनाच्या लाटेत वृत्तवाहिन्यांनी काहीतरी सनसनाटी दाखविण्याच्या नावाखाली स्मशानात जाऊन प्रेतं जळतानाचे शूट्स दाखवून पत्रकारितेच्या नीचतेचा कहर केला होता. हा असला कोडगेपणा करताना यांना लोकांच्या भावनेचा विचार एकदा सुद्धा मनाला स्पर्श करून गेला नसेल? इतकी भावनाशून्यता कुठून येते? बरं, जर का सेन्सॉरने अशा गोष्टींवर बंदी आणायचे म्हटले तर लगेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा म्हणून ही सगळी पिल्लावळ गळे काढेल. 

 

माझ्या मते मोबाईल फोनवरून शूटिंग करणे आणि आक्षेपार्ह अथवा संवेदनशील प्रसंगांचे प्रसारण करणे ह्यावर ताबडतोब कडक निर्बंध येणे जरूरीचे आहे. तुम्हाला आठवत असेलच काही वर्षांपूर्वी अमृतसर जवळील एका भयाण रेल्वे अपघातात शेकडो लोकं मृत्युमुखी पडली होती. पण आजूबाजूचे इतर लोक काय करत होते? जखमी लोकांना मदत करण्याऐवजी आपल्या मोबाईलवर अपघाताचे चित्रीकरण. वाहिन्यांच्या ब्रेकींग न्यूजचा आजार सर्वसामान्य माणसात देखील महामारी सारखा पसरला आहे. काही महिन्यांपूर्वी एका xxxx (कितीही मोठी शिवी कमीच होईल) गळा कापतानाचा व्हिडीओ व्हायरल केला होतामनुष्य इतका क्रूर असेल यावर विश्वास बसत नव्हता. एखाद्या माणसाची झोप कायमची उडेल

 

न्यूज चॅनल देखील "थरार" अशा मथळ्याखाली एक व्यक्ती ट्रेनखाली पडताना दाखवू शकते? अरे, असले दृश्य बघून एखादा म्हातारा हार्ट अ‍ॅटॅक येऊन गचकेल. पण कोणाला त्याची पर्वा आहे? टीआरपी च्या नावाखाली तुम्ही काहीही सनसनाटी म्हणून खपविणार का? अरे, थोडी तरी संवदेनशीलता दाखवा. ही बहुदा प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणारी जमात आहे. या गोष्टींकरिता यांचा कितीही तिरस्कार केला तरी कमीच होईल
 
 
आज सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे असतात त्यामुळे जरी एखाद्या घटनेचे शूटिंग असले तरी ते केवळ आणि केवळ योग्य अधिकारी व्यक्ती, संस्था ह्यांच्याच हातात पडायला हवे. परंतु होते काय की माहिती इतक्या वेगाने व्हायरल होते की आपल्याला काही समजायच्या आधीच आपल्याकडून या गोष्टी बघितल्या जातात. परंतु असे बेजबाबदार शूटिंग करणार्‍या आणि प्रसारित करणाऱ्या विकृत लोकांना आतमधे घेऊन बेदम सोलले पाहिजेत; इतकी ही लोकं भिकारxx झाली आहेत. ह्या लोकांना असे वागून कसला आसुरी आनंद मिळतो हे तो परमेश्वरच जाणे. 
 
 
 
 
कदाचित आता आपण समाज म्हणून, या विनाशकारी मार्गावर, मागे फिरुच शकत नाही अशा टप्प्यावर आहोत की काय अशी मला शंका येते. आपल्यासारखी संवेदनशील लोक सुद्धा या रेट्यात भरडून जाऊन शेवटी नाशच पावणार का? ते नको असे म्हटले तर मग प्रश्न उदभवतो की भविष्यात आपण काय करणार? अशीच विनाशाकडे वाटचाल? निदान या गोष्टींचे प्रेक्षक न बनणं एवढं तरी आपण करू शकतो का? नाहीतर नुसतेच आम्ही या कोडगेपणाच्या गदारोळात बुडून जातो आहोत असे बोंबलण्यात काहीही मतलब नाही. 
 
 
 
@ यशवंत मराठे
yeshwant.marathe@gmail.com 

Leave a comment



Prafulla Agnihotri

3 years ago

पूर्णपणे सहमत. But I feel somewhere deep down this negativity, lies the frustration and anger that the masses are experiencing.
I see the same expression of feelings when I see a vandalized statue or a beautifully coloured wall sloilt by some horrendous writings or paintings. Why don't we see this destructive attitude and behaviour in such a large scale in the Western countries?
IT would be a good topic for research for the sociologist.

Anita

3 years ago

V true write up! I remember Sachin’s post too! Everyone seems to notice or remember bad things well. Same thing with media! All news channels are extremely aggressive these days! Especially when they are giving news of someone’s passing. They show to the details of last rites. Sense of privacy of the bereaved family is totally lost. Media folks also ask absolutely stupid, idiotic questions like how do you feel when you lost your son in war? I feel like getting up and slapping him/her. I remember when Captain Deepak Sathe passed away saving passengers in the flight, media asked his ailing mother about her feelings after losing her son! Have we totally lost compassion, sympathy, love everything? Is TRP is all that important? Who cares for such news? We are really going through very bad phase overall. Each one needs to pause and think and react!

Subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS