Paradigm Shift?

उदारमतवादाला दुभंगणारा खडक

भारतातील उजव्यांच्या उदयातून लोकमानसातील मूलभूत परिवर्तनाचा संकेत.

(This is a translation of a thought provoking article published in Dhaka Tribune. The original article and its link is at the bottom)

NDTV च्या संकेतस्थळावरील २०१९ च्या भारतीय निवडणुकींच्या निकालांचे थेट प्रक्षेपण मी पाहत होतो. सर्व पॅनेलिस्ट यावरच भाष्य करीत होते की बालाकोटचा प्रतिहल्ला भाजपला सत्तेत येण्यासाठी कसा फायद्याचा ठरला व भारतातील तमाम उच्चभ्रूवर्ग हा जनमानसातील राष्ट्रीयत्वाच्या भावनेशी किती अनभिज्ञ आहे.

उच्चभ्रू उदारमतवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या NDTV वाहिनीवर हे प्रक्षेपण चालले होते हे लक्षात असावे. पुनश्च: श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या नेतृत्वाखाली झालेली भाजपची विजयी घोडदौड ही युरोप, ऑस्ट्रेलिया, लॅटिन अमेरिका, संयुक्त अमेरिका (आणि कदाचित लवकरच कॅनडात सुद्धा) अशा जगातील अनेक लोकशाहीमध्ये उसळलेल्या उजव्या विचारसरणीच्या आम जनतेच्या राष्ट्रीयत्वाच्या लाटेलाच अधोरेखित करीत आहे.

प्रत्येक निवडणुकीत प्रस्थापित लोकशाहीतील जनमताचा कौल पाहता असे निदर्शनास येते की ही लाट ही राजकीय वाटचालीतील केवळ एक तात्पुरता उजवा बदल - जो डाव्या विचारसरणीने पुन्हा सत्तांतर घडवून आणू शकेल असा - नसून तो जनमानसाच्या मूलभूत विचारसरणीत झालेला बदल आहे.

काही वर्षापूर्वी, मी नियमित वाचत असलेल्या दक्षिण आशिया विषयक एका ब्लॉगवर एका लोकप्रिय पाकिस्तानी वंशाच्या अमेरिकन लेखकाने एका लिखाणात एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला होता: “जेव्हा केव्हा उदारमतवादाची संकल्पना जळून नष्ट होईल, तेव्हा भविष्यातील इतिहासकार मागे वळून पाहून म्हणतील का की उदारमतवादाचा निर्णायक विनाश हा इस्लामरुपी खडकावर प्रथम आपटून ओढवला?

त्यांचे असे म्हणणे नव्हते की इस्लामने उदारमतवादाला एक हाती जबरदस्त आवाहन दिले अथवा जर सुसंस्कृत जगाच्या निर्मितीच्या प्रक्रियेत इस्लामने खोडा घातला नसता तर “इतिहासाचा अंत” (१) घडवून आणता आला असता.

त्याने असा मुद्दा मांडला की अल्पसंख्याक असतांना वैश्विक साक्षात्काराची मूलभूत गृहीतके स्वीकारण्यास इस्लामने नकार दिल्यामुळे, तसेच मुख्य प्रवाहात सामील होण्यास तीव्र विरोध केल्यामुळे आणि बहुसंख्याक असतांना अतिप्राचीन दैववादाच्या (धर्मगुरूसत्ताक राज्य पद्धतीच्या) पुर्ननिर्मितीचा अट्टाहास केल्यामुळे मुस्लिमांनी संपूर्ण उदारमतवादी विचारसरणी फक्त कमकुवतच केली नाही तर इस्लामच्या पूर्वीच्या कट्टर अनुयायांच्या मनांमध्ये त्याच उदारमतवादी विचारसरणीबद्दल संशयाची बीजे खोलवर रुजवली.

मुस्लिमांच्या वर्चस्व झुगारून देण्याच्या या प्रवृत्तीमुळे उदारमतवादी विचारसरणीमध्ये आधीपासून गर्भित असलेला विरोधाभास लौकर बाहेर उफाळून आला.

आणि हा विरोधाभास खरंच किती प्रचंड आहे! उदारमतवादी विचारसरणी मोडून पडू शकते कारण मुळात मानवी स्वभावच मोडून पडतो हे या विचारसरणीमध्ये पुरेसे मान्यच केले गेलेले नाही. माणसं केवळ उपयुक्तता किंवा संतुष्टता द्विगुणित करणारे नसतात. सुख दु:खे एकमेकांत पूर्ण मिसळून गेलेली असतात.

लोकांना सर्वांबरोबर स्वर्गप्राप्ती व्हावी असे वाटत नाही; काही लोकं, शक्यतो जे थोडे फार आपल्यापेक्षा वेगळे आहेत, ते नरकात जावे असे काहींना वाटते. या विरोधाभासाव्यतिरिक्त तांत्रिक आणि आर्थिक बदलांचे प्रभाव, जागतिक सत्तेतील परिवर्तने, राजकीय शक्तींचा अटळ ऱ्हास ह्यांनी उदारमतवादाचे वर्चस्व कमी करण्यात इस्लामच्या अनुयायांच्या प्रखर विरोधापेक्षा नक्कीच अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

परंतु, या सगळ्यात इस्लामची कारक भूमिका कारणीभूत होती हे नाकारणे कठीण आहे. उजव्या विचारसरणीच्या राष्ट्रीय ओळख असलेल्या राजकीय शक्तीचा उदय हे भारतात कदाचित अपरिहार्य होते, पण पाकिस्तानच्या सततच्या कुरघोड्या व तापदायक शेजारी अशी भूमिका हे भाजपाच्या विस्मयचकीत करणार्‍या वर्चस्वाच्या कारणांपैकी एक असू शकते का? उजव्या विचारसरणीचे बहुसंख्य हे सर्वत्र मुस्लिमांना वेगळे समजून बळीचे बकरे बनवीत आहेत. त्यांच्या या कृतीच्या नैतिकतेबद्दल प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो पण मिळालेल्या यशाबद्दल नाही.

याही पुढे जाऊन, मी असे प्रतिपादन करतो की इस्लामने उदारमतवादी विचारसरणी बद्दल संशयाचे बीज पेरून अथवा त्यातील विरोधाभास दाखवून त्या प्रणालीला दुबळी केली नाहीये तर ती दुबळी झालीय ती दुसर्‍या महायुद्धातील रक्तपाताने विखुरलेल्या आणि नाऊमेद झालेल्या प्रस्थापित लोकशाहीतील आणि त्यानंतर उदयास आलेल्या जागतिक उदारमतवादी प्रणालीतील उदारमतवादाच्या शत्रूंचे एकत्रीकरण आणि सक्षमीकरण झाल्याने.

जगभरातल्या मुस्लिमांकडून स्वतःच्या समूहाची ओळख जपण्याच्या दुराग्रहामुळे समूहाची ओळख उंचावणे हे सगळ्या समूहांना भूषणावह ठरले आहे, मग ते बहुसंख्यांक असोत की अल्पसंख्यांक, बलाढ्य असोत की दुबळे. आजच्या समुह राजकारणाच्या युगात धर्म किंवा राष्ट्राच्या समूह ओळखीमध्ये अनेक घटक हे असमान पेक्षा जास्त समान असतात. जर मुस्लीम लोकं त्यांच्या धार्मिक ओळखीच्या पावित्र्याबद्दल आणि परंपरांबद्दल अविचारीपणे आग्रही असू शकतात तर इतर समूह सुद्धा त्यांच्या सामूहिक ओळखीबद्दल तितकेच कोडगेपण दाखवू शकतात.

अनेक प्रस्थापित लोकशाहींमध्ये मुस्लीम अल्पसंख्यांक असू शकतील, परंतु पूर्ण मानव जातीचा विचार केला तर ते जवळपास एक चतुर्थांश आहेत व त्यांचे आशिया, आफ्रिका व युरोप मध्ये फार प्रबळ अस्तित्व आहे. अन्य धर्मीय लोकांसाठी, मुस्लीम हे अल्पसंख्यांक असूनही असलेल्या लोकसंख्येला व पुष्कळ चर्चिल्या गेलेल्या दक्षिणेकडून (२) येणाऱ्या एका संभाव्य धोक्याचे प्रतिनिधित्व करतात.

तर दुसऱ्या बाजूला जगातील अग्रगण्य राजकीय व जातीय समुहातून उगम पावणाऱ्या राजकीय, सांस्कृतिक व आर्थिक धोक्यांना मुस्लीम हे, बहुसंख्यांक वा अल्पसंख्याक असले तरी, प्रचंड घाबरतात. हे एक भयाचे खोलवर फिरत जाणारे चक्र आहे. एका उदारमतवादी जागतिक व्यवस्थेचा संभाव्य अंत होत असताना त्या घटनेचा मुस्लिमांनी जयघोष करावा हा मूर्खपणाचा कळसच म्हणावा लागेल.

जगातील सर्वात दुबळा व विखुरलेला प्रमुख समूह म्हणून त्यांना या बिघडलेल्या व्यवस्थेची जबर किंमत रक्तपात व दु:खाचे भोग याद्वारे चुकवत रहावी लागेल. चायनातील उईघुर लोकांच्या वाट्याला आलेले भोग हे या उदास अंधःकारमय भविष्याची चाहूलच आहेत.

प्रस्थापित लोकशाहींमध्ये, मुस्लीम हे राजकीयदृष्ट्या उदारमतवादी प्रगतीशील समूहाशी संबद्ध असतात आणि ह्या युतीमुळे उदारमतवाद्यांना असा आरोप करण्याची मोकळीक मिळाली आहे की मुस्लीम उदारमतवादाशी संबद्ध असूनही स्वतःची एक अत्यंत संकुचित विचारसरणीचे अल्पसंख्यांक म्हणून ओळख जपण्याचे दुटप्पी धोरण बाळगतात. सार्वभौमत्वाचा त्याग करून एका विशिष्ट सांप्रदायिक पक्षाला कवटाळणे हे उदारमतवादाला आतून पोखरून काढत आहे. उदारमतवादाची तत्वे एक तर सर्वांनाच लागू असायला हवीत किंवा कोणालाच नसावीत.

शफीकुर रहमान

(हे एक राजकीय विश्लेषक / राजकीय शास्त्रज्ञ आहेत)

टीप

(१) इतिहासाचा अंत म्हणजे इतिहासातील असंस्कृत प्रवृत्तीचा अंत असा अर्थ लेखकाला अभिप्रेत असावा असे मला वाटते.

(२) दक्षिणेकडून येणारा संभाव्य धोका - पश्चिम आशियातील मुस्लिम निर्वासितांचा लोंढा युरोपच्या दक्षिणेकडे असलेल्या भूमध्य समुद्रातून युरोपमध्ये घुसत आहे त्यामुळे लेखक असे म्हणत असावा हा अंदाज.

या लेखाचा मला अभिप्रेत झालेला अर्थ:-

1. उदरमतवाद्यानी स्वत:च्या धर्मातील कट्टरवाद्यांवर नेहमीच टीकेची झोड उठवली परंतु मुस्लिमांना मात्र त्यांच्या पसंतीनुसार जगण्याचा हक्क आहे असा सिद्धांत मांडून त्यांची पाठराखण केली.

2. भारतात हिंदुत्ववाद्याना नेहमीच असा प्रश्न पडतो की त्यांनाच का प्रतिगामी म्हणून संबोधले जाते? आणि मुस्लिमांवर मात्र कोणतीही टीका होत नाही.

3. मुस्लिमांनी इतरांबरोबर जुळवून घेण्यास कायम ठामपणे नकार दिला आणि स्वत:च्या समूहाची ओळख सुरक्षित राखून सुधारणा घडवून आणण्यास विरोधच केला.

4. तसेच हे ही दिसून येते की मुस्लिम बहुसंख्य असले की इतर धर्माचा आदर न ठेवणारी धर्मगुरूसत्ताक राज्य पद्धती प्रस्थापित करायची असते.

5. ते जर असे वागू शकतात तर आपण का नाही अशी (हिंदूंची) प्रतिक्रिया होते.

6. मुस्लिम असे का वागतात ह्याचे उत्तर उदारमतवाद्यांकडे नाही.

ह्यावरून असा निष्कर्ष निघतो की युरोपियन आणि अमेरिकन राजकारणातील उदारमतवादी वर्चस्व तसेच भारतीय राजकारण हे निर्णायकरित्या प्रतिगामी इस्लामने खंडित केले आहे.

यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

(The link of the original article in English published in Dhaka Tribune)

Subject: An insightful comment from the Dhaka tribune.

https://www.dhakatribune.com/opinion/op-ed/2019/05/25/the-rock-that-broke-liberalism?fbclid=IwAR3HZa731JovIMIHjgft590KGYz7DqHs8SwKhYC4RM43LSy5aGvHejrT7ww

The Original Article..

Rock that broke liberalism

The rise of the right in India signals a fundamental shift in the people

I was watching live streaming of the India Election 2019 results on the NDTV website. Panelist after panelist was commenting on how significant were Balakot strikes in boosting BJP’s re-election prospects, and how ignorant are the liberal elites of India about the appeal of national identity among the masses. 

This was NDTV, as a reminder, one of the citadels of India’s liberal elites. BJP’s triumphant re-election under Narandra Modi underscores the wave of right-wing populist nationalism sweeping across democracies of the world -- Europe, Australia, Latin America, the US, Asia, maybe soon in Canada also. 

With every election, every referendum taking place in established democracies, it is becoming apparent that this wave may not be just yet another right turn in the cycle of politics soon to be corrected by pivot to the left, but a fundamental shift in the people themselves.  

A couple of years ago, in a South Asia focused blog I frequent, a much-admired Pakistani-American writer wrote a post posing a great question: “If and when modern humanism and liberalism crashes and burns, will future historians look back and say that Islam was the rock on which it first and decisively broke?” 

His point was not that Islam single-handedly threw a powerful challenge to the liberal order, or “end of history” would have been achieved if Islam didn’t throw a wrench into the gears of civilization. 

He argued that by obdurate refusal to accept the fundamental assumptions of post-enlightenment worldview, by obstinate resistance to assimilate with the mainstream when in the minority and by dogged persistence in recreating antediluvian theocracies when in majority, Muslims not only undermined the universal validity of the whole liberal project, but also sowed deep doubts about the liberal project among its previously most faithful adherents. 

Muslim recalcitrance has hastened delivery of the contradictions that the liberal project was pregnant with from the beginning. 

And the contradictions are huge indeed. The liberal order is prone to breakdown because it doesn’t sufficiently account for the fact that human nature itself is broken. People are not just utility or satisfaction maximizing beings. Enjoyment and suffering are intimately co-mingled. 

People do not just want to reach heaven together; they want some, preferably who are somewhat different, to be confined to hell as well. Apart from the contradictions, surely undercurrents of technological and economic change, the shift in global power balance, the inevitable decay of political order, played a far more important role in undermining the liberal dominance than obstinate resistance of the followers of Islam? 

However, it’s hard to deny any causative role of Islam. The emergence of right-wing, national identity politics was perhaps inevitable in India, but BJP’s astonishing dominance must be partially attributable to Pakistan’s persistent spoiling and nightmare-neighbour role? Right-wing majoritarians everywhere are scapegoating Muslims as the principal other; morality of their methods can be questioned, but the success cannot. 

Moreover, I would argue that Islam has not undermined the liberal order by sowing doubts within liberal ranks or exposing its contradiction, it has weakened liberalism by emboldening and consolidating the enemies of liberalism in established democracies which were scattered and disheartened after the bloodbath of WWII and subsequent emergence of liberal world order. 

Stubborn defense of group identity by Muslims of the world has made upholding group identity respectable for all groups, majority or minority, powerful or weak. In the age of mass politics, group identities like religion or nation have more elements in common than in difference. If Muslims can be unabashedly assertive about the sanctity of their religious identity and traditions, other groups can be unapologetic about their respective identities too.  

Muslims may be a small minority in most of established democracies, but they comprise nearly one-fourth of humanity, and they have a very emphatic presence in Asia, Africa, and parts of Europe. To people of different faiths, Muslims, regardless of their actual numbers as minority, represent the much talked-about demographic threat from the south. 

Muslims, whether in majority or minority, are on the other hand deathly afraid of the political, cultural, and economic threats emanating from the leading political and ethnic groups of the world. It’s a mutual cycle of fear spiraling downwards. Muslims cheering the probable demise of a liberal world order is the height of folly. 

As the world’s most powerless and disunited major group, they will continue to pay the major price of breakdown in blood and misery. Uighurs of China portend that bleak future.  

In established democracies, Muslims are generally politically allied with liberal progressives, and this alliance has opened liberals up to accusation of double standards in protecting a very illiberal minority identity. Abandoning universalism and embracing identitarianism is hollowing out liberalism from within. Either the principles of liberalism apply for all groups or none at all.  

(Shafiqur Rahman is a political scientist.)

Following are my conclusions on the article:

1. Liberals have been very hard on fundamentalists from their own religion but always defended Muslims right to live as they pleased.

2. In India, Hindu Hardliners were puzzled about why they are always termed retrograde while Muslims are not criticized.

3. Muslims have stubbornly refused to assimilate with other people and protected their group identity by refusing to reform.

4. When Muslims are in a majority, they create theocracies which do not respect other religions.

5. Hence the reaction to this world over is that if they can behave in this way, so can we.

6. Liberalism has no answer to why Muslims behave like this.

The conclusion is that the Liberal Domination of European, American as well as Indian Politics is decisively broken because of the backward looking nature of Islam.

Yeshwant Marathe

yeshwant.marathe@gmail.com

#Liberalism #Islam #Muslims #DhakaTribune #Hindu #BJP

Leave a comment



nitin nadkarni

5 years ago

The rightists have Islamic Fundamentalism to thank for it’s rise!

Ajit Suresh Gokhale

5 years ago

6. मुस्लिम असे का वागतात ?.........This was answered by Swatantryaveer Savarkar and BharatRatna Dr BabaSaheb Ambedkar both had learned the reality of Muslim people in their own way. Savarkar said they are a nation in themselves, just because of their faith and indoctrination. They have a very strong feeling of one-ness against other faiths (though internally they have some 79 or 82 factions). And Dr Ambedkar had said, if partition is to happen on the basis of faith; let the last muslim go to pakistan and let the last Hindu come to India ...lets do it in aplanned manner. Because, if this is not done, in a few decades there will not be a free Hindu remaining in Pakistan and India will have a permanent separatist activities ... Both these great people saw what Nehru Could not. ह्याचे उत्तर उदारमतवाद्यांकडे नाही. ...

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS