दिल चाहता है !!

 
आठवतो का हा सिनेमा? आकाश, समीर आणि सिद्धार्थ या तीन मित्रांचा एक भन्नाट चित्रपट!! सिनेमाचे परीक्षण लिहिण्यासाठी हा लेख नाही; हा आहे माझ्या दोन जिवलग मित्रांची ओळख करून देण्याचा एक छोटा प्रयत्न.
 
Initially I thought that I would attempt to hold a clear mirror in front of them. Then I realised that the mirror will not be totally clear as my feelings for them would give the writing a slight bias in their favour. It then struck me that actually “one who has a good friend, doesn’t need any mirror.” Hence the idea of mirror was dropped completely. 
 
मी आधी एका लेखात लिहिल्याप्रमाणे माझी अजय कामत आणि सुधीर नेरुरकर या दोघांचीही ओळख कांतीच्या लायब्ररीत सुमारे ४०-४२ वर्षांपूर्वी झाली. या गोष्टीकरता कांतीचे आभार मानावे तेवढे थोडेच.
 
 
सुधीर
 
सुधीरशी भेट झाली तेव्हा असं लक्षात आलं की त्याची आणि माझी आई मैत्रिणी आहेत. जेव्हा मला कळलं की सुधीरचा वाढदिवस २५ मे ला असतो तर मी पटकन म्हटलं की अरे माझ्या एका मित्राचाही वाढदिवस त्याच दिवशी असतो. तो लगेच म्हणाला, म्हणजे मी तुझा मित्र नाही का? मला इतके ओशाळल्यासारखे झाले की विचारता सोय नाही.
 
मला नक्की साल आठवत नाही पण बहुतेक १९९२-९३ असेल, सुधीरचा धाकटा भाऊ मिलिंद, याचे अमेरिकेत अपघाती निधन झाले त्यावेळी सुधीरकडे पासपोर्ट पण नव्हता. कुठूनतरी ओळख काढून एका दिवसात पासपोर्ट मिळवला नंतर दुसऱ्या दिवशी अमेरिकन व्हिसासाठी पळापळ. ते दोन दिवस त्याच्याबरोबर फिरताना मला खूप वाईट वाटत होते पण मग मनात आलं की याला तर किती त्रास होत असेल? मी आपला एक मूक साक्षीदार म्हणून त्याच्याबरोबर होतो. त्याच्या आयुष्यातील पहिलाच झटका और वो भी जोर से.
 
१०-१५ वर्षांपूर्वी सुधीरची आई आजारी झाली आणि तिच्यासारखी इतकी हरहुन्नरी बाई पार हरवली. सुधीरकडे आलेली काव्यप्रतिभा ही त्याच्या आईचीच देणगी आहे. तिला त्या परिस्थितीत बघणे खूपच त्रासदायक होते पण सुधीरने ते फार चांगल्या पद्धतीने हाताळले. सुधीरच्या बाबांबद्दल तर काय बोलावे? वयाच्या पंचाहत्तरीला माणूस चित्रकला शिकण्याचा ध्यास घेतो हेच अनाकलनीय आहे. He is always so full of life. Simply great. एक दोन वर्षांपूर्वी  सुधीरच्या बाबांना प्रोस्टेट कॅन्सर डीटेक्ट झाला त्यावेळी सुधीरने केलेली एक गोष्ट मात्र अभूतपूर्व होती. तो आणि त्याचे वडील असे दोघेच ३-४ दिवस गोव्याला जाऊन आले. हे असं करणे किती लोकांना सुचलं असतं? माझ्या मते जवळजवळ कोणालाच नाही. Truly wonderful gesture !! मित्रा, तुला सलाम ! 
 
He has been a doting son, loving brother, a great father and a wonderful friend. On a lighter note, I am sure that Sujata will also vouch for him to be good husband.  
 
पण पण.. सुधीर एक मनस्वी व्यक्तिमत्व आहे. त्याच्या मनात कधी काय येईल आणि तो कसा वागेल याची कल्पना बऱ्याच वेळा त्याला स्वतःला पण नसते. He could be unpredictable and sometimes little wild. अजय तर त्याला माकडच म्हणतो. माझा स्वभाव त्या मानाने फारच मवाळ त्यामुळे कधी कधी भीती वाटते की हा कधी आणि कसा वागेल?
 
आमच्या तिघांमध्ये सगळ्यात बिझी असलेला माणूस म्हणजे सुधीर पण त्यामुळे हल्ली भेटी जरा महाग झाल्यात.
 
अजय
 

मी बऱ्याच वेळा कांतीच्या लायब्ररीत गप्पा मारत उभा असायचो तेव्हा अजय अधूनमधून दिसायचा. एकदा त्याच्या हातात उमा ऑफसेट असे लिहिलेली एक रजिस्टर दिसले. आता ऑफसेट म्हटल्यावर माझा इंटरेस्ट वाढला आणि मग त्याच्याशी गप्पा मारायला सुरुवात झाली. बरेच गुण जुळणारे असल्याने मग मैत्री वाढली. संजू कोल्हटकरमुळे डी एल वैद्य रोडवर राहणारी गुप्ते फॅमिली चांगली माहित होती कारण ते त्याचे मामा. अचानक एक दिवस कळलं की अजयने छाया गुप्तेशी लग्न ठरवलं, त्यामुळे मग जवळीक निर्माण झाली.

अजय पाठोपाठ सुधीरचे पण लग्न झाले मग ते चौघे आणि मी एकटा. रात्री जेवण झाल्यावर अजयच्या गच्चीतील टाकीवर जाऊन बसायचं. मग छाया आणि सुजाता यांची मी एकतर गाणे म्हणावे किंवा थोडे चावट जोक सांगायची फर्माईश. आणि त्यावेळी या दोन्ही गोष्टींचा माझ्याकडे भरपूर स्टॉक होता. मग कधी मुख्तार बागवान, नितीन मुंढे, कांती गाला आणि नंतर भाल्या देवधर अशी मित्रमंडळी वाढत गेली. आम्ही सगळ्यांनी अजयचे दोन्ही बंगले (त्याचा आणि त्याच्या वडिलांचा) मस्त एन्जॉय केले. तसेच मी आणि सुधीर खूप वेळा अजयच्या फोर्टमधील ऑफिसमध्ये जायचो, त्यामुळे मग कधीतरी बियर पण बऱ्याच वेळेला इंग्रजी सिनेमाला जाणे हा आवडता छंद. 
 
बदलत्या टेक्नॉलॉजीमुळे अजयने १९९५ साली बॉम्बे प्रोसेस स्टुडिओ विकायचा निर्णय घेतला आणि पाठोपाठ राहता बंगला विकून पुण्याला जाण्याचे नक्की केले. म्हणजे त्याने वयाच्या ३८ व्या वर्षी रिटायर होण्याचे ठरवले. सुरुवातीला मला हे पटतच नव्हते की हे कसं शक्य आहे. वाटलं की मी त्याच्या जागी असेन तर मला वेड लागेल. मला अजयचे भयंकर कौतुक आहे की त्या आयुष्याच्या टप्प्यावर त्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडवून दिले नाही. मला असं वाटतं त्यावेळेला त्याच्या वाचनाच्या आवडीने त्याला वाचवला. त्याच्या मोठ्या भावाचा प्रिंटिंग प्रेस एकदम जोरात चालू होता पण त्याने कधीही आपल्या भावाचा हेवा केला नाही. That was simply unbelievable but extremely creditable.
 
काही काळानंतर छायाला मदत करता करता हाच इस्टेट कन्सल्टंट झाला आणि आज त्याचा व्यवसाय मस्त चालू आहे. त्याच्या सुदैवाने पुण्यातील IT Boom मुळे त्याला प्रचंड हात दिला. He was at the right place at the right time. पण एक गोष्ट नक्की की नुसते नशीब असून चालत नाही; त्याला परिश्रमाची जोड द्यावीच लागते.
 
अजय फार रागावत असेल असे आम्हाला वाटत नाही पण छायाचे म्हणणं कदाचित पूर्णपणे वेगळे असू शकते. पण अजय हे एक बंद पुस्तक आहे. स्वतःबद्दल फार कमी बोलतो; he is a man of few words. त्याच्या मनात काय चाललंय हे अजिबात कळू न देण्याची तो कायम दक्षता घेत असतो. तसेच साधाभोळा असल्याचा तो जो आव आणतो तसा नक्कीच नाहीये. पक्का आतल्या गाठीचा आहे साला.. तोंडून एक शब्द बाहेर पडेल तर शप्पथ. जरा सुद्धा इकडचे तिकडे न जाऊ देण्याची कला त्याने मस्त आत्मसात केली आहे.
 
आणि तिसरा मी 
 
या दोघांच्या मानाने शामळू. माझ्याबद्दल तुम्हाला माहित आहेच त्यामुळे वेगळे सांगण्यासारखे काही नाही.
 
तुम्हाला माझ्या नीरजा संस्थेच्या कामाबद्दल कल्पना आहेच. पण या दोघांनी त्याला जी काल्पनिक जोड दिली उसका जवाब नही!
 
एकदा आमची भेट झाली असता मला म्हणाले तू इतके समाजकार्य करतोस त्यामुळे तुझा स्थानिक लोकसंग्रह वाढला असेल त्यामुळे आम्ही असे ठरवले आहे की पुढील काही वर्षांनी तू पालघर जिल्ह्यातून निवडणुकीला उभे राहायचेस कारण तू जिंकणार याची आम्हाला खात्री आहे. राजकारणातील माणसाला नुसत्या नावाने संबोधून चालत नाही त्यामुळे आजपासून तू भाऊसाहेब मराठे. पण आमचा मित्र असल्यामुळे  फक्त आम्हाला साहेब म्हणण्याची सक्ती नाही, आम्ही तुला भाऊ म्हणणार. आता प्रत्येक राजकारणी माणसाला सल्लागार लागतातच. त्यामुळे आम्ही कॉफ अँड पीट नावाने कन्सल्टंसी सुरु केली आहे आणि तुझी सगळी कामे आम्ही करणार. राजकारणी माणूस भ्रष्टाचारी असतोच आणि तो स्वतः कधीच पैसे घेत नाही; त्यामुळे आलेल्या लोकांना तू कॉफ अँड पीट, म्हणजे आमच्याकडे पाठवायचे. आम्ही पैशाचा सगळा मामला सांभाळू. मला तर काही कळेनाच की हा काय प्रकार चालला आहे. खोलात गेल्यावर असे कळले की आयुर्वेदाच्या कुठल्यातरी प्रश्नावलीवरून त्यांना असा शोध लागला होता की एकाची कफ प्रकृती आहे तर दुसऱ्याची पित्त प्रकृती आहे. कॉफ अँड पीट याचे उगमस्थान कफ आणि पित्त याच्यात होते. माझी हसूनहसून मुरकुंडी वळली. मी खरं तर त्या दोघांपेक्षा लहान आहे पण त्यांनी मला वाकून नमस्कार केला आणि म्हणाले भाऊ आशीर्वाद द्या. मी हसत म्हटले की माझ्या शरीराकडे बघता मी नक्कीच वात प्रकृतीचा असणार. मला म्हणाले आमची कल्पना भन्नाट आहे की नाही? मी दोघांना साष्टांग नमस्कार करायचा बाकी ठेवला; म्हटले, अरे हे तुम्हाला सुचतं कसं?
 
गंमतीची गोष्ट म्हणजे मी राजकारणापासून खूप दूर असलो आणि कायमच राहीन तरी देखील सात आठ वर्षांपूर्वी केलेले माझे "भाऊ" हे नामनिधान त्यांनी अजून चालूच ठेवले आहे. 
 
काही वर्षांपूर्वी आम्ही आमच्या तिघांचाच असा एक WhatsApp ग्रुप बनवला आणि आमच्या तिघांचे स्वभाव लक्षात घेऊन आमच्या ग्रुपचे नावच “दिल चाहता है” (DCH) असे ठरवले. आता आमच्यातील आकाश, समीर आणि सिद्धार्थ कोण हे तुम्हीच ठरवा.
 
खरं सांगायचं तर ग्रुपमुळे आमच्यातील संवाद मस्त वाढला आणि our friendship has evolved in last 5-7 years. Frankly what is friendship? It is basically sharing. It is like being ourselves without any masks. आम्ही या कालावधीत सिनेमातील तीन मित्रांप्रमाणेच रोड ट्रिप्स सुद्धा केल्या; कधी कोस्टल कर्नाटक तर कधी गोवा आणि लांबचं जमत नसेल तर पाचगणी, महाबळेश्वर आहेच.
 
आश्चर्याची गोष्ट म्हणजे अजयमध्ये देखील या काळात थोडा फरक पडलाय आणि पडतोय. हल्ली कधीतरी मध्येच त्याला मित्रत्वाचा अटॅक येतो आणि ग्रुपवर आमच्या मैत्रीबद्दल काहीतरी भन्नाट वाचायला मिळते पण डोळ्यावर विश्वास बसत नाही. हे खरंच अजयने लिहिलंय?
 
Guys, you two have been the pillars of psychological support to me, whenever I have needed. And saying simple thanks will not give true picture of my feelings.
 
Frankly, the purpose of writing this piece was to achieve a time machine, friendship glue (फेव्हिकॉल का जोड), and a wake up call to live life more & more fully whilst we are here as we are indeed blessed to have each other.
 
 
 
So, my friends, here is toast to us, as we slide down the bannister of life, may all the splinters point in the right direction.
 
 
Cheers!! 🥂🥂
 
यशवंत 
 
 
 
 
 
 

Leave a commentHemant Marathe

3 years ago

वा मस्त. तुमची मैत्री अशीच सदैव बहरत राहो. 👌👍

Leela Dharwatkar

3 years ago

Very well written! Enjoyed it as I know all of you . Have heard about your trips many times. Long live you 3 and your friendship.
Continue to write and entertain. All the best.

Madhuri Gawande

3 years ago

May your friendship be eternal 🙏

Rahul

3 years ago

Coff and Pitt ......what a concept
Superb Yeshwant

माया देवधर

3 years ago

खूप सुंदर व्यक्त केले आहेस

अशोक प्रभू

3 years ago

Superb write up.
Thanks for sharing.

RAJENDRA MADHUSUDAN PHADKE

3 years ago

मस्त - मैत्री आणि मित्रांची वर्णनं !

Sudhir Nerurkar

3 years ago

भाऊ तुमच्या लेखनाला प्रोत्साहन देताना हा धोका लकढत आला नव्हता की तुमच्या लेखणीची तोफ आमच्याकडे वळेल. 😀😀. आता आम्हालाही हातात लेखणी घेऊन भाऊंची बखर लिहायला पाहिजे. But truly you opened up a time machine. In a straight, simple and wonderfully loving way. I got calls and messages from our common friends who are also your readers, saying this blog triggered a beautiful trip into nostalgia for them too. मग मला आणि अजय ला किती आणि काय काय उसळून आलं असेल आपल्या मैत्रीच्या सहजीवनातल कल्पना कर. As you said in the end of the blog , let the splinters go in the right direction. Cheers buddy. 🤗🤗🤗
- Sudhir

D A Patwardhan

3 years ago

D A Patwardhan

3 years ago

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS