Brahman by Maria Wirth

This is a Marathi Translation of an article by German Maria Wirth. The original article is also posted below the Marathi version.

ब्राह्मणांना त्यांनी भारतात केलेल्या आणि करत असलेल्या कृत्याबद्दल अपराधी वाटते का?

ब्राह्मणांना अपराधी का वाटावे? त्यांना अभिमान वाटला पाहिजे. केवळ त्यांच्यामुळे भारताला आणि जगाला वेदातील अमूल्य ज्ञानाचा किमान काही हिस्सा, हजारो वर्षांपासून त्यांनी अथक परिश्रमाने, मुखोद्गत करून पुढील पिढ्यांपर्यन्त पोहोचविल्यामुळे मिळाला.

मला वाटते असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या प्रश्नकर्त्याच्या मनात जातीव्यवस्था असावी. मला माहित आहे की संपूर्ण जगाला जाती व्यवस्थेविषयी माहिती आहे. मला प्राथमिक शाळेतच त्याबद्दल कळले होते, परंतु फक्त काही वर्षांपूर्वी नाझी जर्मनीने काय केले होते किंवा गुलामांवरचे अत्याचार, वसाहतवाद याबद्दल मात्र काहीच माहित नव्हते. भारतीय जातीव्यवस्था आणि अस्पृश्य लोकांबद्दल आम्हा जर्मनीतील आणि खात्रीने इतरत्रही मुलांना शिकवले होते. अत्यंत दयनीय दिसणार्‍या अस्पृश्यांची चित्रे दाखवली गेली. असा समज करून देण्यात आला की ह्यापेक्षा वाईट काही असूच शकत नाही असा आम्हा मुलांवर ठसा उमटवण्यात आला. हा समज चुकीचा तर आहेच परंतु त्यामागे सुप्त खोडसाळ हेतु आहे.

मला माहित आहे की मी आता धोका पत्करलेला आहे, मी परदेशी असल्यामुळे मला भारतातील सत्य परिस्थिती काहीच माहिती नाही असे समजून काही ब्राह्मण (ब्राह्मण नाव असणारी) माणसे माझ्यावर हल्ला करु शकतात. जगभरात, विशेषतः डाव्या विचारसरणीच्या लोकांमध्ये ब्राह्मण विरोधी वादाने वातावरण गढूळ झाले आहे.

होय, जाती व्यवस्था अस्तित्त्वात आहे आणि अस्पृश्यही आहेत. आणि जगभरात सर्वत्र ते अस्तित्वात आहे. मी या तपशिलात शिरत नाही की मूलतः वेदांमध्ये जात (वर्ण) व्यवस्था वंशपरंपरागतच होती किंवा नाही. वास्तविकता अशी आहे की ब्राह्मणांना इतर कोणत्याही जातीपेक्षा पावित्र्यासाठी जास्त नियमांचे पालन करावे लागते. मला एक ब्राह्मण बाई माहित होती जी आंघोळ करण्यापूर्वी तिच्या स्वयंपाकघरात प्रवेश करत नसे. ब्राह्मण हे वेदांच्या सूचितेचे/पावित्र्याचे राखणकर्ते होते. म्हणूनच हे समजू शकतो की मृतप्राण्यांची विल्हेवाट लावणार्‍या किंवा गटारे स्वच्छ करणार्‍यांना ते स्पर्श करणार नाहीत, जरी ही कामे करणार्‍या माणसांची समाजाला गरज होती आणि आहे. पाश्चिमात्यांपैकीही प्रत्येकजण त्यांच्याशी हातमिळवणी करणार नाही. परंतु त्या गोष्टीचा बाऊ केला जात नाही.

युरोपमधील सर्वोच्च राजघराणे जे मजूरवर्गात कधीही मिळून मिसळून वागत नाही त्यांच्यावर कोणतेही आरोप होत नसताना मात्र भारतीय समाज रचनेबद्दल जगभरात, एवढी आरडाओरड का केली जाते? इतकेच नाही तर भारताने स्वातंत्र्यप्राप्ती नंतर मागास जातींच्या कल्याणासाठी अनेक सकारात्मक कृती केल्यामुळे आज उलट ब्राह्मणांना त्रास सहन करावा लागत आहे त्यांना वाईट वागवले जाते आहे.

एका भारतीय सदगृहस्थांनी मला सांगितल्याप्रमाणे कर्नाटकातील मडिकेरी शहरात, तसेच कदाचित संपूर्ण देशभरातल्या क्लबमध्ये “फक्त गोर्‍यांसाठी” अशी पाटी लावणार्‍या ब्रिटीशांवर कोणीही नाराज का नाही?

ब्रिटीशांच्या कृषी धोरणामुळे जवळजवळ २५ दशलक्ष भारतीय उपासमारीने मृत्यूमुखी पडले याबद्दल कोणीही नाराज का नाही? इंटरनेटवर अत्यंत कृश, मृतपाय भारतीयांचे भयंकर फोटो आहेत जिथे प्रत्येकजण मृत्युपंथाला लागलेला दिसतो.

गुलामगिरीची प्रथा संपुष्टात आल्यावर ब्रिटिशांनी, मागणी असलेल्या मजुरांना गलबतात कोंबून भारतातून संपूर्ण जगभरात पाठवले, कित्येक जण प्रवासादरम्यानच मृत्यूमुखी पडले (ऊसाच्या मळ्यातील छळणूकीपासून सुटलेले) याबद्दल कोणालाही दु:ख का नाही?

मुस्लिमांनी हिंदूंवर, विशेषत: ब्राह्मणांवर केलेल्या आक्रमणांमुळे काय झाले याबद्दल कोणी का बोलत नाही? ते किती क्रूर होते? किती हिंदू मारले गेले किंवा गुलाम केले गेले? किती हिंदू महिलांनी मुस्लिम सैन्याच्या हाती पडू नये म्हणून जोहार केला?

त्यावेळी काय घडले याची कल्पना आम्ही आज ISIS वरून करू शकतो, त्याबद्दल त्यांना ‘धन्यवाद’. मात्र डावे ‘कार्यकर्ते’ आणि ब्रिटीश पार्लंमेंटचे ‘आदरणीय’ सदस्य सुद्धा या सर्व गोष्टींबद्दल नाही तर केवळ भारतातील ‘भयंकर, अत्यंत अमानुष जातीव्यवस्था’ याबद्दल चिंतित आहेत. ‘Caste’ हा शब्द सुद्धा, भारतीय नसून पोर्तुगीज आहे आणि हे सहजपणे सिद्ध होते की वसाहतवाद्यांनी जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न यशस्वी केला.

माझा मुद्दा असा आहे: ब्राह्मणांनी बहुजन समाजापासून/इतरांपासून पासून वेगळं राहून किंवा त्यांना दूर लोटूनही जे काही केले ते ख्रिश्चन वसाहतवादी आणि मुस्लिम आक्रमकांनी केलेल्या तुलनेत नगण्यच आहे. ब्राह्मणांनी खालच्या जातीतील किती लोक मारले किंवा त्यांचा छळ केला? आणि जर एखाद्या ब्राह्मणानं केले असेल तर ते निश्चितच वेदसंमत नव्हते.

मग जाती-व्यवस्थेतील तथाकथित अत्याचारांचा इतका गवगवा का होतो? मला असे वाटते खरोखरी ज्या लोकांनी भारतात केलेल्या आणि अजूनही करीत असलेल्या कृत्याबद्दल अपराधी वाटले पाहिजे अशा लोकांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी. आज ब्राम्हणांना कित्येकदा गरीब असूनही, मुख्यतः आरक्षणामुळे तसेच धार्मिक अल्पसंख्यांक किंवा निम्न/खालच्या जातींतील लोकांना देण्यात येणाऱ्या फायद्यांमधून/सवलतींमधून वगळल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.

पण हे एकमेव कारण नाही. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे ब्राह्मणांना अपराधी असण्याची जाणीव करून देणे आणि वेद मुखोद्गत करून त्याचे अध्ययन करून, त्याचे अध्यापन करणे, ह्या त्यांच्या मूळ धर्माचे पालन करण्याबाबत त्यांच्यात अनिच्छा निर्माण करणे. वैदिक ज्ञान भारतातून नाहीसे करण्याचे उद्दीष्ट आहे, कारण ते ख्रिस्ती आणि इस्लामसाठी धोका निर्माण करते. हे त्यांच्या तथाकथित “प्रकट सत्याला” आव्हान देऊ शकते. वेदांची शिकवण ही उपयुक्त, अर्थपूर्ण आहे आणि म्हणूनच ख्रिस्ती धर्माचा आणि इस्लामचा संपूर्ण जगात विस्तार करण्यासाठी सर्वात मोठा अडथळा आहे.

हे ब्राह्मणांना झोडपणे थांबवण्याची वेळ आली आहे. तो खोटेपणा वाटतो, विशेषत: जेव्हा ISIS कडे मात्र, कोणताही भावनिक/सांप्रदायिक रंग न देता किंवा निषेध न करता फक्त वस्तुस्थितीचा उल्लेख करून तटस्थपणे पाहिले जाते. उदा. “ISIS ने १९ येझीदी महिलांना त्यांनी ISIS च्या सैनिकांबरोबर शरीर संबधाला नकार दिल्याने लोखंडी पिंजर्‍यात जाळून ठार मारले”.

काही काळापूर्वी, मी दक्षिण भारतातील एका मंदिरात एक वृद्ध ब्राह्मण जोडपे पाहिले. ते नीटनेटके, परंतु अतिशय कृश होते. प्रसाद वाटला जात असताना, ते माझ्या आधी रांगेत होते. नंतर मी त्यांना पुन्हा रांगेत पाहिले.. गरिबी हे त्याचे कारण होते.

नाही, ब्राह्मणांना अपराधी वाटण्याची गरज नाही. इतरांना गरज आहे, परंतु ते इतर निर्लज्ज आहेत आणि त्यांना वाटणार नाही. आणि डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ते त्यांना तसे वाटून देणार नाहीत.

मरिआ विर्थ

yeshwant.marathe@gmail.com

#Maria_Wirth #Brahman # Caste_System #Untouchability #Islam #Christian

Do Brahmins feel guilty for what they have done & doing to India?

Why should Brahmins feel guilty? They should feel proud. It is because of them that India and the world still has at least a part of this most precious wisdom that is contained in the Vedas, because they painstakingly memorised them and passed them on over many thousands of years.

I guess the questioner has the caste system in mind. I am aware that the whole world knows about the caste system. I also knew already in primary school about it but knew nothing about what Nazi Germany had done only a few years earlier or about the atrocities of slavery, colonialism, but about the Indian caste system, and about untouchables, we children in Germany and surely elsewhere, too, were taught. Pictures were shown of poor, miserable looking untouchables. The impression was given that nothing was worse than that, and it left this impression on us children. This impression is not only wrong but has a mischievous agenda.

I know I tread dangerous ground now, as even some people with Brahmin names may attack me for not knowing anything about the ground realities in India, being a foreigner. The atmosphere is vitiated with ‘anti-Brahmanism’ especially in the Left all over the world.

Yes, caste system exists, and untouchables, too. And it exists all over the world. I won’t go into it that originally, in the Vedas, the caste (varna) was not necessarily hereditary. Fact is that Brahmins have to stick to many more rules for purity than any other caste. I knew a Brahmin lady who would not enter her kitchen before having taken a bath. Brahmins were the guardians of the purity of the Vedas. So it is understandable that they would not touch those who for example remove the dead bodies of animals or clean the sewers, though a society needs people, who do these jobs, too. In the west, too, not everyone would shake hands with them. But no issue is made out of it.

So why is there such hue and cry worldwide over the structure of the society in India, when nobody accuses for example the royalty, the highest caste in Europe that it does not mingle with workers? More so, since independent India has done so much affirmative action in favour of the lower castes, so that today, it is often the Brahmins who suffer, and who are unfairly treated?

Why nobody is upset that the British had signs of “Only for Whites” in the club of Madikeri town in Karnataka, as an old Indian gentleman told me, and probably all over the country?

Why is nobody upset that the agriculture policy of the British starved some 25 MILLION Indians to death? There are absolutely terrible pictures on the net of Indians only being skin and bones, barely alive. Each one dying a slow death.

Why is nobody upset that the British, after the slave system was abolished, sent indented labour from India all over the world in cramped vessels, where a big number died during the journey already (and were spared the torture in the sugarcane estates)?

Why nobody talks about what the Muslim invasions did to Hindus and especially to Brahmins? How cruel they were? How many Hindus were killed or made slaves? How many Hindu women committed mass suicide by jumping into fire so that they won’t fall into the hands of the Muslim troops?

Today, ‘thanks’ to ISIS we can well imagine what happened then, yet the Left ‘activists’ and even ‘respectable’ British Parliamentarians are not concerned with all this, only with the ‘terrible, most inhuman caste system’ of India. Caste is not even an Indian, but a Portuguese word, and it can be safely assumed that the colonial masters tried their best to drive a wedge between the castes – successfully, it turns out.

My point is: what Brahmins did by segregating from others or even snubbing others is negligible in comparison what Christian colonialists and Muslim invaders did. How many people from lower castes were killed or tortured by Brahmins? And if a Brahmin did it, he surely did not have the sanction from the Vedas.

So why are the so-called atrocities of the caste-system so hyped? My guess is to divert the attention from those who really should feel guilty what they did and still do to India. It’s not the Brahmins. They suffer today, mainly due to reservation and, though poor in many cases, by being excluded from benefits which are given to religious minorities or lower castes.

But this is not the only reason. Another important reason is to make Brahmins feel guilty and to make them reluctant to follow their original Dharma of memorising and teaching the Vedas. The goal is to make Vedic knowledge disappear in India, because it poses a danger for Christianity and Islam. It can challenge their so called “revealed truths”. Vedic knowledge makes sense and is therefore the greatest obstacles for Christianity and Islam to expand over the whole world.

It is about time to stop this Brahmin bashing. It sounds fake, especially, when ISIS gets neutral treatment by just mentioning facts, like, “ISIL burns 19 Yazidi women to death in iron cages because they refused to have sex with fighters” without any emotional colour or condemnation.

Some time ago, I saw an old Brahmin couple in a temple in south India. They had dignity, but were very thin. When Prasad (sacred food) was distributed, they were in the queue before me. Later I saw them again in the queue…. It was due to poverty.

No, Brahmins don’t need to feel guilty. Others need to, but those others are brazen and probably won’t. And the leftist activists won’t remind them.

Maria Wirth

Leave a commentNitin

2 years ago

Thank God someone finally has the courage to call a spade a spade!

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS