सतीचं वाण

आपल्या सगळ्यांना शाळेत शिकवले गेले आहे की सतीची कुप्रथा आपल्या समाजात होती आणि त्यामुळे नवरा मृत झाला की स्त्रीला त्याच्या चितेवर बसवून जाळले जाई. हे कधी ऐच्छिक असे तर कधी बळजबरीने सतीचा बळी दिला जाई. या कुप्रथेविरुद्ध राजा राममोहन रॉय यांनी आवाज उठवला आणि त्या नंतर ब्रिटीश सरकारने १८२९ साली बंगाल सती कायदा करून ही प्रथा बंद पाडली. 
 
बरोबर ??? 
 
सतीच्या प्रथेत स्त्रियांवर अन्याय झाला हे निर्विवाद सत्य आहे पण बऱ्याच वेळा स्त्रिया स्वतः निर्णय घेऊन सती जाण्यास तयार दिसायच्या. असे कसे शक्य आहे? सती प्रथेला प्रारंभ कधी झाला? तो झाला मुस्लीम आक्रमणांच्या नंतर. सुरुवातीला ही परंपरा राजघराण्यात होती; नंतर ती समाजात पसरली. का?? 
 
आपल्याकडे हल्ला करणारे मुस्लीम आक्रमक हे केवळ रानटी आणि लिंगपिसाट नव्हते तर ते मनोरोगी सुद्धा होते. म्हणजे हल्ला करणार, शत्रूला पराभूत करणार, त्यांच्या स्त्रियांना बलात्कार करून करून मारून टाकणार. त्यांची ही वृत्ती ज्ञात असल्याने राजस्थानातील स्त्रिया जोहार करत किंवा पतीसह सती जात. 
 
पंधराव्या आणि अठराव्या शतकात आपल्या देशात सर्वाधिक सती गेल्याची नोंद ब्रिटिशांनी केली आहे. ती किती आहे ? संपूर्ण देशात वर्षाला १०००; म्हणजेच एकूण या दोनशे वर्षात साधारण २,००,००० स्त्रिया सती गेल्या अशी नोंद आहे. आता आपण क्षणभर असे समजूया की हे आकडे खरे आणि प्रामाणिक आहेत. 
 
आता एक दुसरी गोष्ट बघूया.  
 
१४८४ साली पोप व्हिन्सेट सातवा याने निसर्गपूजा आणि मूर्तीपूजा करणारी स्त्री ही चेटकीण आहे आणि तिला शिक्षा करणे आवश्यक आहे हे घोषित केले. १४८४ ते १७५० या कालखंडात फक्त पश्चिम युरोप मध्ये (मुख्यत्वे ग्रेट ब्रिटन) मध्ये २,००,००० स्त्रियांना चेटकीण घोषित करून पकडले गेले, तिचे घर जाळले गेले, तिचा छळ केला, तिचे स्तन उपटून काढले, तिला हातपाय बांधून नदीत किंवा समुद्रात बुडवून टाकले आणि या सगळ्यातून ती जगली तर तिला जिवंत जाळले आहे. याचा ख्रिस्ती लोक गौरवाने विच हंटिंग असा उल्लेख करतात. 
 
युरोपची तत्कालीन लोकसंख्या भारताच्या १०% सुद्धा नसेल तिथे २५० वर्षात २ लाख स्त्रिया काहीही अपराध नसताना धार्मिक परंपरा म्हणून जिवंत जाळल्या जातात परंतु तेच ब्रिटीश आपल्याला सती प्रथेसाठी रानटी ठरवतात आणि त्याची मागची कारणमीमांसा विचारात घेत नाहीत. हा ढोंगीपणा समजून घ्या.. 
 
ब्रिटीशांचे राज्य म्हणजे देशावर उपकार ही ज्यांची मानसिकता असेल तर त्यांनी हे लक्षात घेणे आवश्यक आहे. 
 
आता ब्रिटीशांचा आकडा खरा आहे असे मानले तर आज भारतात २ लाख सतीची मंदिरे असायला हवी कारण आपल्याकडे कुठेही कुणीही सती गेले की सतीचे मंदिर किंवा चबुतरा बनवला जातो. मला १००% खात्री आहे संपूर्ण देशात मिळून सुद्धा सतीची मंदिरे ब्रिटीश सांगतात त्याच्या १०% सुद्धा नसतील. 
 
 
 
 
सतीची प्रथा निश्चित वाईट होती. इथे त्याचे समर्थन करणे हा उद्देश नसून या क्रूर प्रथेच्या नावाखाली भारतीयांना जे रानटी ठरवले जाते आहे त्यातील फोलपणा दाखवून देणे आवश्यक आहे म्हणून हा लेख. 
 
 
@ यशवंत मराठे 
yeshwant.marathe@gmail.com 
 
 
प्रेरणा: सुजीत भोगले यांचा लेख 

Leave a comment



Anil Joshi

2 years ago

यशवंत,
सती प्रथा आणि इंग्रज यांची सरमिसळ करण्याचे तसे प्रयोजन नाही. मोगली राजवटीत जोहार म्हणून सती जाण्याचे प्रमाण प्रचंड वाढले ही वस्तुस्थिती आहे. राजस्थानातल्या जवळपास सर्व गावात एक तरी सती शीला किंवा सती मंदिर आहे. सती प्रथेविरोधात कायदे करणाऱ्यात फक्त इंग्रज नाहीत. पोर्तुगीज ,फ्रेंच, डच आदी इतर युरोपीय सत्तांनी देखील सती प्रथेवर बंदी घालण्याचे प्रयत्न केले होते. अगदी मुघलांनी देखिल! गव्हर्नर जनरल बेंटिक व राजा राम मोहन रॉय यांचे प्रयत्न ठळकपणे समोर येतात त्याचे कारण हे कायदे झाले त्या वेळेला ब्रिटिश साम्राज्याने हिंदुस्थानचा फार मोठा भूभाग व्यापला होता. कायदे करून नुसते न थांबता त्याचा अंमल व्हावा यासाठीदेखील व्यापक प्रयत्न झाले. सती प्रथेला काही धार्मिक कारण आहे का माहित नाही परंतु आपल्या पुरुष प्रधान मानसिकतेचे हे एक ढळढळीत प्रतीक आहे हे मात्र निश्चित! या पुरुष प्रधान मानसिकतेचा थोडेसे अंतर्मुख होऊन विचार करायचा का इंग्रजांनाही रानटी ठरवायचे समाधान घ्यायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
डॉ अनिल जोशी

Sunil Deshmukh

2 years ago

Dusaryane shen khalle mhanun apan khallele shen sugandhi hot nahi.

You are a brilliant writer but this article has weak logic and wrong timeline for the Suttee Pratha which is mentioned in Ancient Indian lit dating back to BCE.
Of course, the West including America has blood on their hand on the Witch and Red Indian slaughter. That doesn’t make the Suttee any milder atrocity.
BTW, these things are taught in the American schools without any whitewash. So no need to sift peddle the Suttee Pratha
Regards
Sunil

Subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS